DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

देशमुखांचं अपहरण केलेली काळी स्कॉर्पिओच आरोपींना शिक्षेपर्यंत नेणार!

अहवालात सापडले १९ पुरावे.

DD News Marathi by DD News Marathi
March 27, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
देशमुखांचं अपहरण केलेली काळी स्कॉर्पिओच आरोपींना शिक्षेपर्यंत नेणार!

बीड प्रतिनिधी :
दि. २७ मार्च २०२५

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे. या हत्याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांनीच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचं सांगितलं. तर, आता याप्रकरणी काळ्या स्कॉर्पिओतील पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ही काळी स्कॉर्पिओ या गुन्ह्यात वापरण्यात आली होती. या गाडीत एकून १९ पुरावे आढळून आले आहेत. हे पुरावे आरोपींना शिक्षेपर्यंत नेणार असल्याची माहिती आहे.

या गाडीचा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल हाती लागला आहे. या आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी याच गाडीमधील फिंगरप्रिंट्स आणि हे पुरावे महत्त्वाचे ठरणार आहेत. काळ्या रंगाची स्कार्पिओ पासिंग क्रमांक एम एच ४४ झेड ९३३३ या गाडीवर एकून ९९ ठसे आढळून आले आहेत. डाव्या बाजूच्या दरवाज्यावरील काचेवर २ ठसे मिळाले आहेत. जुळून आलेले फिंगरप्रिंटचे ठसे सुधीर ज्ञानोबा सांगळे या आरोपीचे आहेत, असा अहवाल फिंगरप्रिंट ब्युरोने दिला आहे. ही स्कॉर्पिओ गाडी आरोपी गँगचा म्होरक्या सुदर्शन घुलेची आहे.

संतोष देशमुख यांना कुठे आणि कशी मारहाण केली,हेही प्रतीक घुलेने पंचांसमक्ष सांगितलं आहे. संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी टाकळी शिवारात अमानुष मारहाण करत हत्या करण्यात आली होती. यातील आरोपी प्रतीक घुले याला सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला होता. यावेळी प्रतीक घुले याने संतोष देशमुख यांना ज्या ठिकाणी मारहाण केली ते ठिकाण दाखवत त्याच्या जवळच असलेल्या एका काटेरी झुडपातून मारहाण करण्यासाठी वापरलेली बांबूची जाड काठी देखील काढून दिली होती. माऊली कारखाना ते टाकळी रोडवर आम्ही संतोष पंडितराव देशमुख यास विविध हत्याराने मारून त्याचा खून केला होता. त्यावेळी मी त्याला मारण्याकरता वापरलेलं हत्यार तेथे लपवून ठेवले आहे ते ठिकाण दाखवतो आणि हत्यार देखील देतो असे प्रतीक घुले याने पंचांसमक्ष सांगितले होते, तो पंचनामा आता समोर आला आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #BlackScorpio#PratikGhule#santoshDeshmukh#SudarshanGhule
Previous Post

जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे यांच्यामुळे लोक माझ्यासाठी कठीण परिस्थिती निर्माण करतील!

Next Post

दिशा सालियनने वडिलांमुळे आत्महत्या केली?

Next Post
दिशा सालियनने वडिलांमुळे आत्महत्या केली?

दिशा सालियनने वडिलांमुळे आत्महत्या केली?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.