DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

विमानाने ये-जा करून चोरी करणारा अजब VIP भामटा!

सापडला पोलिसांच्या जाळ्यात.

DD News Marathi by DD News Marathi
March 31, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
विमानाने ये-जा करून चोरी करणारा अजब VIP भामटा!

सोलापूर प्रतिनिधी :
दि. ३१ मार्च २०२५

सोलापुरात एका अट्टल चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा चोरटा चोरी करण्यासाठी हजारो रुपये खर्च करून विमानाने प्रवास करायचा. जिथे चोरी करायची आहे, त्या शहरात गुन्हा करून तो पुन्हा विमानाने आपल्या मूळगावी परतायचा. धक्कादायक बाब म्हणजे हा घरफोडी करणारा भामटा एक कोटींच्या बंगल्यात राहत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. अनिल कुमार मिस्त्रीलाल राजभर असे त्याचे नाव असून त्याच्यावर ३५ गुन्हे दाखल आहेत.
उत्तर प्रदेशमधून महाराष्ट्रात विमानप्रवास करून हा चोरटा मुंबईत यायचा. यानंतर तो रेल्वेने सोलापूर गाठायचा. सोलापुरात घरफोडी केल्यानंतर परत तो – उत्तर प्रदेश येथील लखनऊला जायचा. त्यासाठी मुंबईतून तो विमानाने प्रवास करायचा. आंतरराज्य चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या या अट्टल चोराला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.. सोलापुरातील शिक्षणाधिकाऱ्याच्या घरी कोणी नसताना घरफोडी करून चोरी करणाऱ्या प्रकरणात आंतरराज्य गुन्हेगाराला सोलापूर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

अलीकडेच सोलापुरात शिक्षणधिकाऱ्याच्या घरी त्याने चोरी केली होती. त्यानंतर तो उत्तर प्रदेशात निघून गेला. मात्र सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेला तो पुन्हा सोलापुरात येत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कसून तपास केल्यानंतर राजभर हा पोलिसांच्या ताब्यात आला.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Solapur#Theft_in_Plane#UttarPradesh#अनिलकुमार_ मिस्त्रीलाल_राजभर
Previous Post

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात वाहन खरेदीचा कहर!

Next Post

हर्षवर्धन सपकाळांनी पुण्यातल्या आपल्या ४ शिलेदारांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली!

Next Post
हर्षवर्धन सपकाळांनी पुण्यातल्या आपल्या ४ शिलेदारांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली!

हर्षवर्धन सपकाळांनी पुण्यातल्या आपल्या ४ शिलेदारांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.