DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अजित पवार यांच्या मामेभावाच्या कंपनीने केला विश्वविक्रम, एका दिवसात 39.671 किलोमीटरचा तयार झाला रस्ता

पुसेगाव ते म्हासुर्णे रस्ता तयार करण्याचा नवा विश्वविक्रम

DD News Marathi by DD News Marathi
June 1, 2021
in ताज्या बातम्या
0
अजित पवार यांच्या मामेभावाच्या कंपनीने केला विश्वविक्रम, एका दिवसात 39.671 किलोमीटरचा तयार झाला रस्ता
सातारा प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. ०१ जुन २०२१
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा 39.671 किलोमीटरचा रस्ता एका दिवसात तयार केला. यामध्ये 25. 54 कि.मी. रस्ता हा अवघ्या 14 तासात पूर्ण करुन विजापूर-सोलापूर 25.54 कि.मी. रस्त्याचा विक्रमही मोडला असून नवा विश्वविक्रम स्थापित केला आहे. राजपथ इन्फाकॅान ही अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांची कंपनी आहे. 
हे काम 3 शिफ्टमध्ये एकाचवेळी 6 ठिकाणी करण्यात आले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे 15 अभियंत्यांनी काम पाहिले. उद्योजकामार्फत 60 अभियंते, 47 पर्यवेक्षक, 23 गुणवत्ता नियंत्रक अभियंते, 150 वाहन चालक, 110 मजूर असे एकूण 390 कर्मचाऱ्यांद्वारे काम करण्यात आले. अधीक्षक अभियंता संजय मुनगीलवार,  कार्यकारी अभियंता शंकर दराडे यांनी स्वत: सुक्ष्म नियोजन करुन ते तडीस नेण्यासाठी मागील दोन हिन्यांपासून सतत कार्यरत होते.
गुणनियंत्रक पथकामार्फत कामाच्या गुणनियंत्रणासाठी बिटुमिन एक्सट्रॅक्टर, बिटुमिन पेनीट्रोमीटर, केंबरप्लेंट, सिव्हस् यासारखे साहित्य वापरण्यात आले. तसेच या कामासाठी 8 मॉडर्न बॅचमिक्स प्रकारे हॉटमिक्सर प्लॅन्ट, 7 मॉर्डन सेन्सर पेव्हर, 12 व्हायब्रेटरी रोल, 6 न्युमॅटीक रोलर 180 डंपर (हायवा) वअन्य यंत्रसामुग्रींचा वापर करण्यात आला. 1100 मे. टन डांबर व 6000 घनमीटर खडीचा वापर करण्यात आला.
या कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या कामासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिल्याचे अधीक्षक अभियंता संजय मुनगीलवार यांनी सांगितले. या उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, उद्योजक यांचे दूरध्वनीवरुन कौतुक केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार, मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे, आदींनी रस्त्याच्या कामाची पाहणी करत राजपथ इन्फ्राकॉनचे कौतुक केले. हा उपक्रम कौतुकास्पर असून भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रातील अभियंते व उद्योजक, कंत्राटदार यांच्यासाठी दिशादर्शी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी राजपथ इन्फ्राकॉनचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक जगदीश कदम, संचालिका मोहना कदम, अर्थ संचालक डॉ. राजेंद्र हिरेमठ, प्रकल्प संचालक शिवनाथ ढाकणे, सरव्यवस्थापक रोहिदास पिसाळ, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.
असा झाला विक्रम,
या विक्रमी प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी राजपथ टीमने सूक्ष्म नियोजन केले. ३० किलोमीटरच्या या रस्त्याला सहा तुकड्यांमध्ये विभागण्यात आले. प्रत्येक भागातील काम करण्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत होती. या कामासाठी एकूण ११,००० मेट्रीक टन बिटुमन काँक्रीट, त्यासाठी आठ हॉट मिक्स प्लांट होते. काँक्रीटचे हे मटेरीअल पसरविण्यासाठी सहा पेव्हर, १२ टँडम रोलर व सहा पी.टी.आर. वापरण्यात आले. या मटेरीअलची ने-आण करण्यासाठी एकूण १८० हायवा टिप्पर वापरण्यात आले. प्रकल्प व्यवस्थापक, तीन हायवे इंजिनिअर, दोन क्लालिटी इंजिनिअर, दोन सर्व्हेअर आणि ७१ कर्मचारी असे एकूण ७९ कर्मचारी एका टीममध्ये होते. एकूण सहा भागांचे मिळून ४७४ कर्मचारी पुर्ण कामासाठी तैनात होते. यासाठी व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली होती.
बातमी नक्की शेअर करा
Previous Post

पंढरपुर शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात भगीरथ भालके यांचे निवेदन

Next Post

आणखी एका तरुणाने गाव केले कोरोनामुक्त, कोरोनाची लढाई जिंकणारे आदर्श सडेगाव…!

Next Post
आणखी एका तरुणाने गाव केले कोरोनामुक्त, कोरोनाची लढाई जिंकणारे आदर्श सडेगाव…!

आणखी एका तरुणाने गाव केले कोरोनामुक्त, कोरोनाची लढाई जिंकणारे आदर्श सडेगाव...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

December 10, 2025
जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

December 10, 2025
महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

December 10, 2025
बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.