DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

‘वक्फच्या बिलाचा आणि हिंदुत्त्वाचा काही संबंध नाही!

RSSचा ही याला विरोध - संजय राऊतांचा गंभीर आरोप.

DD News Marathi by DD News Marathi
April 2, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
‘वक्फच्या बिलाचा आणि हिंदुत्त्वाचा काही संबंध नाही!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ०२ एप्रिल २०२५

आज लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक दुपारी मांडले जाणार आहे. संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चर्चा चालणार आहे. विधेयकाध्ये विरोधी पक्ष काँग्रेसने सुचवलेल्या सुधारणांमध्ये बदल केला न गेल्याने त्यांनी नारजी व्यक्त केली आहे, अशातच यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्त्व शिकवू नये. भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हा आम्ही हिंदुत्त्वाच्या मिशांना पिळ मारत देशभर फिरत होतो. वक्फच्या बिलाचा आणि हिंदुत्त्वाचा काही संबंध नाहीये. हे एक साधारण बिल असून त्यात काही सुधारणा सरकार करु इच्छित आहे. या सुधारणांना फक्त देशातील मुसलमानांचाच नाहीतर संघाचाही पूर्ण पाठिंबा नाही. जसं औरंगजेबाची कबर तोडण्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेला संघाने विरोध केला की उगाच वातावरण खराब करू नका. आताही संघाची अशीच भूमिका आहे. या बिलाचा आणि हिंदुत्त्वाचा काही संबंध आहे का हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगू शकतील काय़? असा सवाल संजय राऊतांनी फडणवीसांना केला आहे .

इतर सुधारणा बिलांप्रमाणे हे एक बिल आहे. वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर भविष्यामध्ये कब्जा मिळवण्यासाठी काही उद्योगपतींना सोपं जावं यासाठी या बिलाचं स्पष्ट प्रयोजन दिसत आहे. शिवसेना ही प्रोग्रेसिव्ह विचारांचा हिंदुत्त्ववाद मानणारी आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने हिंदुत्त्वाला सुधारणा आणि विज्ञानवाद याचा पाठिंबा दिला आहे. फडणवीस असतील किंवा त्यांचे बगलबच्चे असतील, वक्फ बोर्डाच्या निमित्ताने बांग देताहेत. हा मूर्खपणा आहे. हिंदुत्त्व हे हिंदुत्त्वाच्या ठिकाणी असल्याचं राऊत म्हणाले.

आम्ही विरोधी पक्षात असताना भाजपने आणलेल्या कलम ३७० च्या बिलाला पाठिंबा दिला होता. तो विषय राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदुत्त्वाच्या संदर्भात होता. त्यानंतर तिहेरी तलाकच्याही बिलाला विरोध केला नाही कारण तो विषय गरीब महिलांच्या संदर्भात होता. आता वक्फ बोर्डच्या बिलाचा विषय हा त्यांच्या लाखो आणि कोटी रूपयांच्या जमिनीसंदर्भातील विषय आहे. भविष्यामध्ये त्या प्रॉपर्टी लाडक्या उद्योगपतींना देता येतील का, ही त्यासाठी झालेली पायाभरणी आहे हे मला स्पष्ट दिसत अससल्याचा दावा राऊतांनी केला आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Article_370#DevendraFadnavis#SanjayRaut#WaqfAmendmentBill
Previous Post

आज लोकसभेत सादर होणार वक्फ संशोधन विधेयक!

Next Post

दिशा सालियनचा मृत्यू पूर्वनियोजित मर्डरच?

Next Post
दिशा सालियनचा मृत्यू पूर्वनियोजित मर्डरच?

दिशा सालियनचा मृत्यू पूर्वनियोजित मर्डरच?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.