DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पाकिस्तानी कलाकारासोबत काम करणारी अभिनेत्री काय बोलली?

म्हणाली..."आम्हाला सरकारने परवानगी दिलीये",

DD News Marathi by DD News Marathi
April 3, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
पाकिस्तानी कलाकारासोबत काम करणारी अभिनेत्री काय बोलली?

मुंबई प्रतिनिधी :
दि. ०३ एप्रिल २०२५

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि वाणी कपूर यांचा ‘अबीर गुलाल’ हा सिनेमा पुढील महिन्यात रीलिज होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री रिद्धी डोगरादेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाला होत असलेल्या विरोधादरम्यान रिद्धीची एक जुनी प्रतिक्रिया सध्या व्हायरल झाली आहे.

पाकिस्तानी अभिनेत्याची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कडाडून विरोध झाला. मनसेने या चित्रपटाच्या रीलिजला आव्हान दिले आहे. मनसेकडून असा दावा केला जातो आहे, २०१६ मध्ये प्रोड्यूसर्स असोसिएशन, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात झालेल्या कराराचे उल्लंघन या चित्रपटामुळे झाले आहे. या कराराअंतर्गत भारतीय चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग रोखण्यात आला होता.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याप्रकरणी असे ट्वीट केले होते की, “पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, हे इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच. मग त्यांना कचऱ्यात टाकायचं काम मनसैनिकांनाच करावं लागणार आणि आम्ही ते करणार, करत राहणार… ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही. ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय त्यांनी खुशाल घ्या, पण लक्षात ठेवा सामना आमच्याशी आहे.”

शिवाय त्यांनी माध्यमांशी बोलताना असेही म्हटले की, पाकिस्तानी कलाकार काम करत असणारा कोणताही सिनेमा इथे रीलिज होणार नाही, तो रीलिज करण्याची काही गरजही नाहीये. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनीदेखील सोशल मीडियावर संताप व्यक्त केलाय. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आधीही पाकिस्तानी कलाकारांना देशातून हाकलून दिलं आहे आणि आताही फवाद खानचा ‘अबीर गुलाल’ हा सिनेमा प्रदर्शित झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तो उधळून लावल्याशिवाय राहणार नाही”, असे त्यांनी म्हटले.

या सर्व वादादरम्यान ‘अबीर गुलाल’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या रिद्धी डोगराची २०२४ मधील एक जुनी मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पाकिस्तानमधील कलाकारांसोबत काम करण्याची परवानगी आहे की नाही, याची पडताळणी करुनच तिने या चित्रपटात काम केले आहे, असे स्पष्ट विधान रिद्धीने केले.

रिद्धी म्हणाली की, “कलेमध्ये कोणतेही विभाजन नसते. जेव्हा आपण नाटक किंवा चित्रपट पाहतो तेव्हा आपल्याला फक्त पात्र दिसतात, त्यांची राष्ट्रीयता नाही. मी फक्त एक गोष्ट तपासली की मला त्या राष्ट्रीयत्वाच्या (पाकिस्तानी) व्यक्तीसोबत काम करण्याची परवानगी आहे की नाही, आणि हो आपल्या देशाने आणि सरकारने आम्हाला ती परवानगी दिली आहे.” तिने पुढे स्पष्ट केले की जर कायदेशीर परवानगी नसती तर तिने हा चित्रपट केला नसता.

आरती एस बागडी दिग्दर्शित ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट ९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच वाणी आणि फवाद यांच्यातील रोमँटिक केमिस्ट्री दाखवणारा चित्रपटाचा पहिला प्रोमोदेखील रीलिज झाला आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AbeerGulal#FavadKhan#RiddhiDogra#VaniKapoor
Previous Post

“आम्ही एकमुखाने एक क्षणाचाही विचार न करता पाठिंबा दिला असता, जर…”

Next Post

येरवडा उड्डाणपुलावर अचानक दुचाकीस्वाराच्या छातीवर गोल्फ कोर्सचा बॉल आदळला!

Next Post
येरवडा उड्डाणपुलावर अचानक दुचाकीस्वाराच्या छातीवर गोल्फ कोर्सचा बॉल आदळला!

येरवडा उड्डाणपुलावर अचानक दुचाकीस्वाराच्या छातीवर गोल्फ कोर्सचा बॉल आदळला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.