DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

येरवडा उड्डाणपुलावर अचानक दुचाकीस्वाराच्या छातीवर गोल्फ कोर्सचा बॉल आदळला!

पुण्यात विचित्र अपघात!

DD News Marathi by DD News Marathi
April 3, 2025
in क्रीडा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
येरवडा उड्डाणपुलावर अचानक दुचाकीस्वाराच्या छातीवर गोल्फ कोर्सचा बॉल आदळला!

पुणे प्रतिनिधी :
दि. ०३ एप्रिल २०२५

येरवडा येथील गोल्फ क्लब कोर्समध्ये गोल्फ खेळताना खेळाडूने मारलेला चेंडू थेट बाहेरील उड्डाणपुलावरून जाणाऱ्या दुचाकीस्वार तरुणाच्या छातीवर लागला. त्यानंतर चेंडू रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांवर आदळला. यामुळे अनेक वाहनांनी अचानक ब्रेक मारला. यामुळे पुलावर वाहनचालकांचा मोठा गोंधळ उडाला. दरम्यान, संबंधित तरुणाने येरवडा पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला आणि तक्रार अर्ज दाखल केला; पण पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.

या प्रकरणी ३२ वर्षीय तरुणाने गोल्फ क्लब प्रशासनाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तरुण आणि त्याचा मित्र दुचाकीवरून शनिवारी सायंकाळी पाच वाजता गुंजन चौकातून उड्डाणपुलावरून जेल रस्त्याकडे जात होते. साधारण पाच वाजून दहा मिनिटांनी उड्डाणपूल उतरत असताना डावीकडून वेगाने गोल्फचा पांढऱ्या रंगाचा चेंडू मैदानातून पुलाच्या दिशेने आला आणि तरुणाच्या छातीवर आदळला. त्यानंतर चेंडू उड्डाणपुलावरून जाणाऱ्या अनेक वाहनांच्या काचेवर आदळला. या दरम्यान चेंडू लागलेल्या तरुणाने चेंडू घेऊन येरवडा पोलिस ठाणे गाठले आणि पोलिस अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी तरुणाला तक्रार अर्ज देण्यास सांगितले. तरुणाने तक्रार अर्ज दाखल करून दोन दिवस झाले तरीही अद्याप यावर काहीही कार्यवाही झाली नाही.

यापूर्वी गोल्फ क्लब कोर्सच्या सीमाभिंतीवरून अतिवेगाने येणारा चेंडू रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या तोंडावर लागल्याचा प्रकार २९ नोव्हेंवर २०२३ रोजी घडला होता. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पूना क्लब गोल्फ कोर्सचे व्यवस्थापन आणि गोल्फ खेळणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, यानंतरही असे प्रकार घडत असल्याने येथील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

“शनिवारी सायंकाळी उड्डाणपुलावरून येताना गोल्फ कोर्स मैदानातून अतिवेगाने चेंडू येऊन माझ्या छातीला जोरात लागला. शिकाऊ खेळाडूंच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या निष्पाप लोकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे गोल्फ क्लब कोर्स प्रशासनावर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी जखमी तरुणाने केली आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: ##Accident#GolfCourse#PoonaClub#Yerawda#YerawdaFlyoverPune
Previous Post

पाकिस्तानी कलाकारासोबत काम करणारी अभिनेत्री काय बोलली?

Next Post

बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत व्यक्ती एक टूथब्रश विक्रेता!

Next Post
बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत व्यक्ती एक टूथब्रश विक्रेता!

बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत व्यक्ती एक टूथब्रश विक्रेता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.