मुंबई प्रतिनिधी :
दि. ०४ एप्रिल २०२५
बॉलिवूड स्टार्सची एकूण संपत्ती कोट्यवधींमध्ये आहे आणि शाहरुख खान संपत्तीच्या बाबतीत या सर्व स्टार्सना मागे टाकतो. सलमान खान आणि आमिर खान यांची एकूण संपत्तीही शाहरुख खानपेक्षा खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत किंग खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. पण बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीचं नाव दुसऱ्याच व्यक्तीचं आहे, जे फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत उघड झालं आहे.
फोर्ब्सच्या २०२५ च्या अब्जाधीशांच्या यादीत जगातील ३०२८ डॉलर अब्जाधीशांची नावं उघड झाली आहेत. या यादीत भारतातील मनोरंजन उद्योग आणि माध्यमांसह विविध क्षेत्रातील २०५ लोकांचा समावेश आहे. या यादीनुसार, बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती अभिनेता नाही, तर एकेकाळी टूथब्रश विकणारा आणि आता चित्रपट निर्माता आहे.
चित्रपट निर्माते आणि उद्योजक रॉनी स्क्रूवाला बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादी २०२५ नुसार, त्यांची एकूण संपत्ती १२,०६२ कोटी रुपये आहे. अशाप्रकारे, रॉनी स्कोवालाने संपत्तीच्या बाबतीत शाहरुख खानला मागे टाकलं आहे, ज्याची एकूण संपत्ती ६,५६६ कोटी रुपये आहे. एवढंच नाही तर, शाहरुखसोबत सलमान खान (३,३२५ कोटी) आणि आमिर खान (१,८७६ कोटी) यांची एकूण संपत्ती जोडली तरी रॉनी स्क्रूवालाची एकूण संपत्ती आणखी जास्त असेल. तिन्ही खानची एकत्रित संपत्ती ११,७८४ कोटी रुपये आहे.
सुपरस्टार्ससोबतच, रॉनी स्क्रूवालाने संपत्तीमध्ये प्रसिद्ध श्रीमंत निर्मात्यांनाही मागे टाकलं आहे. त्याने गुलशन कुमार (७६७४ कोटी) आणि आदित्य चोप्रा (६८२१ कोटी) यांच्या एकूण संपत्तीलाही मागे टाकलं आहे.
रॉनी स्क्रूवालाने आपला व्यवसाय प्रवास टूथब्रश उत्पादन कंपनीपासून सुरू केला होता. त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली अनेक उत्तम चित्रपट बनवले गेले. यामध्ये ‘स्वदेस’, ‘रंग दे बसंती’, ‘जोधा अकबर’, ‘फॅशन’ आणि ‘दिल्ली बेली’ या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय ‘हिप हिप हुर्रे’, ‘शका लका बूम बूम’, ‘खिचडी’ आणि ‘शरत’ सारखे टीव्ही शो देखील रॉनी स्क्रूवालाच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनवले गेले आहेत.