DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार ८७व्या वर्षी कालवश!

मनोरंजन विश्व शोकाकुल!

DD News Marathi by DD News Marathi
April 4, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन
0
ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार ८७व्या वर्षी कालवश!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ०४ एप्रिल २०२५

देशभक्तीपर चित्रपटांसाठी आणि ‘भारत कुमार’ या टोपणनावाने ओळखले जाणारे भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झालं आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तम चित्रपट देणारे बॉलिवूडचे सुपरस्टार मनोज कुमार यांनी आपल्या चित्रपटांमधून लोकांना पडद्यावर देशभक्तीची खोल भावना अनुभवायला लावली. मनोज कुमार हे हिंदी चित्रपटांमध्ये देशभक्त अभिनेत्याचा चेहरा म्हणून ओळखले जायचे. असं म्हटलं जातं की, भगतसिंग यांचा या अभिनेत्यावर खूप प्रभाव आहे आणि त्यांनी ‘शहीद’ सारख्या देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम केलं आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले.

मनोज कुमार हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक देशभक्तीपर चित्रपटांमध्ये दिसले. मनोज हे भारतातील एकमेव चित्रपट निर्माता असल्याचं म्हटलं जातं ज्यांनी सरकारविरुद्ध खटला जिंकला. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवेशाची कहाणीही बरीच रंजक आहे. असं म्हटलं जातं की एकदा ते कामाच्या शोधात एका फिल्म स्टुडिओमध्ये फिरत होते. त्यांनी त्यांना सांगितलं की ते काम शोधत आहेत. त्यांना इथे काम मिळालं पण चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लागणारे दिवे आणि इतर आवश्यक उपकरणे उचलून हलवावी लागली. त्यांनी आपले काम परिश्रमपूर्वक केले आणि नंतर त्यांना चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम मिळू लागलं.

बऱ्याचदा, मोठे कलाकार शूटिंग सुरू होण्याच्या थोड्या वेळापूर्वीच सेटवर पोहोचायचे. सेटवर नायकावर प्रकाश कसा पडेल हे तपासण्यासाठी, मनोज कुमार यांना नायकाच्या जागी उभं करायला लावण्यात आलं. एके दिवशी ते असेच उभा होते आणि त्यांचा चेहरा प्रकाशात इतका आकर्षक दिसत होता की, दिग्दर्शकाने त्यांना एक छोटीशी भूमिका दिली. १९५७ च्या फॅशन चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली. येथून त्यांचा चित्रपटांमधील प्रवास सुरू झाला. यानंतर, मनोज कुमार यांना सलग दोन चित्रपट मिळाले आणि ते एक प्रसिद्ध चेहरा बनले.

दरम्यान, मनोज कुमार यांनी ‘संतोष’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘बे-इमान’, ‘कलयुग और रामायण’, ‘अनिता’, ‘आदमी’, क्रांती’ यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #BharatKumar#Bollywood#Kranti#ManojKumar#manojKumarDies#RotiKapdaaurMakan
Previous Post

‘छावा’च्या डरकाळीने बॉक्स ऑफिस अवाक!

Next Post

नरेंद्र मोदी आणि अमित शहांना अभिनेता कमाल आर. खानचा फुल्ल सपोर्ट!

Next Post
नरेंद्र मोदी आणि अमित शहांना अभिनेता कमाल आर. खानचा फुल्ल सपोर्ट!

नरेंद्र मोदी आणि अमित शहांना अभिनेता कमाल आर. खानचा फुल्ल सपोर्ट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.