पुणे प्रतिनिधी :
दि. ०८ एप्रिल २०२५
तुम्हाला घर बांधायला वर्ष-दोन वर्ष लागत असतील तर जरा थांबा. तंत्रज्ञानाने अशी प्रगती केली आहे की, आता तुमचे घर फक्त 4 महिन्यात बांधून होऊ शकते. हो. आम्ही सत्य बोलत असून आज एक अनोखी माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
तुम्ही 3D फोटो, 3D सिनेमे वगैरे पाहिले असतील पण कधी 3D घर पाहिलं आहे का? नसेल पाहिलं तर पुण्यात तुम्ही ते पाहू शकता. भारतात पहिल्यांदाच 3D हाऊस तयार करण्यात आले आहे. तुम्ही देखील या 3D घराला पाहून आश्चर्यचकित व्हाल.
हे 3D घर अनोखंच म्हणावं लागेल. हे घर पुण्यात बांधण्यात आले आहे. हा 3D प्रिंटेड व्हिला, कंटेंट क्रिएटर प्रिया सारस्वत यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. विशेष म्हणजे हा 3D प्रिंटेड व्हिला तुम्हाला बाहेरून अप्रतिम दिसत असला तरी आतमधून देखील हा 3D प्रिंटेड व्हिला काही कमी नाही. आतून देखील हा व्हिला खूप सुंदर आहे.
3D प्रिंटेड व्हिला हा अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीत तयार करण्यात आला आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे. हा अनोखा 3D प्रिंटेड व्हिला गोदरेज प्रॉपर्टीज आणि ट्वास्टा एंजिनियरिंग यांनी तयार केला आहे.
आता हा 3D प्रिंटेड व्हिला नेमका कसा बनला, हा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. हा 3D प्रिंटेड व्हिला बांधण्यासाठी खास प्रकारच्या काँक्रीट 3D प्रिंटरचा वापर करण्यात आला आहे. प्रिंटरने या घराची संपूर्ण रचना थरावर थर तयार करून केली आहे . प्रोजेक्ट डायरेक्टरने सांगितले की, हे घर बांधले नाही, तर छापले आहे.
हा 3D प्रिंटेड व्हिला 2038 चौरस फुटांमध्ये पसरलेला आहे. यात राहण्याची मोठी जागा असून दोन बेडरूम आहेत. बाहेरील भिंती दुहेरी थरांमध्ये बनविलेल्या आहेत. घरासाठी पाईप, वायर आणि इतर फिटिंग सहज करता याव्यात यासाठी त्यांच्यामध्ये रिकाम्या जागा सोडण्यात आल्या आहेत. पारंपरिक पध्दतीने घर बांधण्यासाठी एक-दोन वर्षांचा कालावधी लागत असला तरी हे घर अवघ्या 4 महिन्यांत बांधले जाते.
घराच्या भिंतींना चांगले इन्सुलेशन असते. यामुळे कमी प्रमाणात ऊर्जेच्या वापराने त्याचे तापमान कमी-अधिक प्रमाणात राखता येते. या खास प्रकारचे नवे आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पाहून नेटिझन्स देखील शॉक झाले आहेत.
हे पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले असून या तंत्रज्ञानाचे भरभरून कौतुक करत आहेत. 3D प्रिंटिंग तंत्रज्ञान वेगाने तयार करता येते, कमी खर्चात वापरता येते आणि त्याचबरोबर घराचा टिकाऊपणाही राखता येतो. भारतात लवकरच अशी आणखी बांधकामे दिसू शकतात आणि हे तंत्रज्ञान वेगाने वाढू शकते.