DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

जेल माझं घर! बिल्डरकडे ‘फिल्मी डायलॉग’ मारत मागितली खंडणी!

पोलिसांनी चांगल्याच नांग्या ठेचल्या.

DD News Marathi by DD News Marathi
April 8, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
जेल माझं घर! बिल्डरकडे ‘फिल्मी डायलॉग’ मारत मागितली खंडणी!

नागपूर प्रतिनिधी :
दि. ०८ एप्रिल २०२५

राज्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे काही गुन्हेगारांना पोलिसांचं भय राहिलेलं नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय. नागपुरातून तर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कुख्यात गुन्हेगार बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यालयात जातो आणि त्याला चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडून तब्बल 7 लाखांची खंडणी मागतो. विशेष म्हणजे जेल माझं घर आहे. तुला काय करायचं ते कर, असंही हा आरोपी म्हणतो. आपल्याला पोलिसांचं कोणतंही भय नाही, असंही तो त्याच्या वागणुकीतून दाखवतो. त्याने काही दिवसांपूर्वी टास्क फोर्समधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. याच प्रकरणात तो फरार होता. यानंतर त्याने आता थेट एका बांधकाम व्यवसायिकाकडे खंडणी मागितली आहे. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पण या गुन्हेगाराच्या मनात पोलिसांबद्दल भीती निर्माण होईल का? असा प्रश्न आहे.

‘जेल माझं घर आहे, आत येणं-जाणं सुरूच असतं’, अशा फिल्मी डायलॉगसह सात मजली इमारतीचे बांधकाम करणाऱ्या एका नामांकित बिल्डरकडून तब्बल 7 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या लक्की ऊर्फ गुज्जर पवीत गौरे (वय २१) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (६ एप्रिल) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवी वस्ती परिसरात घडली.

मनमोहन ओमप्रकाश मुंदडा (वय ४८) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. सदर परिसरात त्यांची सात मजली इमारत उभारणीच्या अंतिम टप्प्यात आहे. रविवारी सायंकाळी आरोपी लक्की त्यांच्या साईटवर गेला आणि थेट मुंदडा यांना चाकूचा धाक दाखवत धमकावत म्हणाला, “तुझं सात मजली इमारतीचं काम सुरू आहे, तुझी सात करोडची स्कीम सुरू आहे तर मला सात लाख रुपये हप्ता लागेल. जर तुला एकसोबत द्यायचे असेल तर दे, नाहीतर इंस्टॉलमेंट ने दे, आणि माझ्यावर आधीच गुन्हे दाखल आहेत, मला काही फरक पडत नाही. जेल माझं घरच आहे!” असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मनमोहन ओमप्रकाश मुंदडा यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेची दखल घेत आरोपी लक्की याला अटक केली.

कुख्यात गुंड लक्की ऊर्फ गुज्जर पवीत गौरे दोन महिन्यांपूर्वी एमपीडीएखाली अटकेतून सुटल्यावर पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झाला आहे. त्याच्यावर चोरी, घरफोडी, मारहाण, दहशत पसरविणे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्याने मध्यप्रदेशात स्पेशल टास्क फोर्सच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणात तो सध्या फरार होता. नागपूरमध्ये बिल्डरकडून खंडणी मागितल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #BuilderExtortion#LakkiGaure#NagpurCrime
Previous Post

पुण्यात भारतातलं पहिलं 3D प्रिंटेड घर तयार!

Next Post

बंद होणार जुने सिमकार्ड? सरकार उचलणार मोठं पाऊल!

Next Post
बंद होणार जुने सिमकार्ड? सरकार उचलणार मोठं पाऊल!

बंद होणार जुने सिमकार्ड? सरकार उचलणार मोठं पाऊल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.