DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

एका झाडामुळे शेतकरी झाला चक्क कोट्याधीश!

आजोबांची मेहनत फळाला आली!

DD News Marathi by DD News Marathi
April 14, 2025
in महाराष्ट्र
0
एका झाडामुळे शेतकरी झाला चक्क कोट्याधीश!

यवतमाळ प्रतिनिधी :
दि. १४ एप्रिल २०२५

यवतमाळ जिल्ह्याच्या एका शेतकर्‍याला एका झाडाने रात्रीतून करोडपती केले. ही बाब कुणाच्याही पचनी पडणार नाही . मात्र हे सत्य आहे. ही कथा आहे पुसद तालुक्यातील खुर्शी येथील एका शेतकर्‍याची! केशव शिंदे असं या शेतकर्‍याचे नाव आहे. एका वडिलोपार्जित झाडामुळे त्यांना अचानक ही लॉटरी लागली. न्यायालयात दाद मागितल्यानंतर या झाडाचे मूल्यांकन काढले तेव्हा ते 4 कोटी 97 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आणि एकच गजहब उडाला.

केशव शिंदे यांच्या 7 एकर वडिलोपार्जित शेतात एक झाड आहे. 2013 — 14 पर्यंत हे झाड कशाचे आहे हे शिंदे परिवाराला माहीतच नव्हते. 2013 – 14 मध्ये रेल्वे खात्याने एक सर्वे केला. त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले होते. त्यांनी हे झाड रक्त चंदनाचे असल्याचे आणि त्याचे मूल्य समजावून सांगितले. त्यावेळेस शिंदे परिवार एकदम चक्रावून गेला. त्यानंतर रेल्वेने भूसंपादन केले मात्र या झाडाचे मूल्य देण्यास रेल्वे खाते टाळाटाळ करत होते.

त्यामुळे या परिवाराने या झाडाचे खासगी संस्थेकडून मूल्यांकन काढले. त्यावेळेस त्याचे मूल्यांकन 4 कोटी 97 लाख रुपये असल्याचे समोर आले. मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शिंदे कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. आता त्यातील पन्नास लाख रुपये शेतकर्‍याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर ते पैसे काढण्याची परवानगी शिंदे परिवाराला देण्यात आली आहे. सुरुवातीला शिंदे कुटुंबाने खाजगी अभियंत्याकडून रक्तचंदनाच्या झाडाचे मूल्यांकन काढले . मात्र ते जास्त असल्याने रेल्वेने त्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा शिंदे यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केले.

शंभर वर्षे जुन्या चंदनाच्या डेरेदार वृक्षाचा मोबदला म्हणून मध्य रेल्वेतर्फे एक कोटी रुपयाची रक्कम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा करण्यात आली. त्यातील 50 लाख रुपये बँकेतून काढण्याची परवानगी नागपूर खंडपीठाने दिली. तसेच शिंदे यांना पूर्ण मोबदला देण्याच्या दृष्टीने त्या वृक्षाचे मूल्यांकन करण्याचे आदेश खंडपीठाने दिले.

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी पंजाब शिंदे यांची शेत जमीन संपादित करण्यात आली आहे. मूल्यांकनानंतर उर्वरित रक्कम शेतकर्‍याला मिळेल. याचिकेवर न्यायमूर्ती अविनाश खरोटे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेतून 8 फेब्रुवारी 2018 रोजी पारित केलेला मोबदला रद्द केला गेला आणि लाल चंदनाचे वृक्ष व इतर वृक्षाविषयीचे आदेश गेल्या सुनावणीत दिले होते. त्यानंतर एक कोटी रूपयांची रक्कम न्यायालयात जमा केल्याची माहिती रेल्वेने न्यायालयात दिली .

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Crorepati#Farmer#IndianRailway#KeshavShinde#RaktaChandan#RedSandalwood#Yavatmal
Previous Post

अमेरिकेने आता भारतावर लादलेल्या आयात शुल्काला 90 दिवसांसाठी स्थगिती!

Next Post

पुण्यातील सोसायटीत घुसले सशस्त्र मुखवटाधारी!

Next Post
पुण्यातील सोसायटीत घुसले सशस्त्र मुखवटाधारी!

पुण्यातील सोसायटीत घुसले सशस्त्र मुखवटाधारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.