DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मुंबईत रात्री बाईकस्वाराला लुटले!

कचरा गाडीमुळे लुटारूंच्या मुसक्या आवळल्या!

DD News Marathi by DD News Marathi
April 16, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
मुंबईत रात्री बाईकस्वाराला लुटले!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १६ एप्रिल २०२५

पूर्व द्रुतगती महामार्गावर रात्रीच्या वेळेस एका दुचाकीस्वाराला अडवून, त्याला धमकावून दोघांनी दुचाकी आणि मोबाईल पळवला, महामार्गावर अशी लूट झाल्याने विक्रोळी पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र काहीच धागादोरा मिळत नव्हता. रात्रीची वेळ असल्याने सीसीटीव्हीतही काही स्पष्ट दिसेना. तपासादरम्यान महापालिकेची कचरा गाडी येथून गेल्याचे समजले. या गाडीला पुढे असलेल्या कॅमेऱ्यात रात्रीच्या वेळेस लूटमार करणारे दोघे कैद झाल्याचे दिसले. यातून पोलिसांना तपासाची दिशा मिळाली आणि ठाणे येथून दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी येथे ४ एप्रिलच्या रात्री दुचाकीवरून जाणाऱ्या स्वप्नील भाबुदे याला धक्का लागल्याचे कारण पुढे करून दोघांनी थांबवले. त्याला धमकी देऊन आणि मारहाण करत दुचाकी आणि त्याच्याकडील मोबाइल हिसकावून घेतला. त्यामुळे धक्का बसलेल्या स्वप्नील याने दुसऱ्या दिवशी विक्रोळी पोलिस ठाण्यात तक्रार केली.

महामार्गावर अशा घटना घडत असल्याने याची गंभीर दखल घेऊन अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त विजय सागर आणि वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गिरीश गायकवाड, उपनिरीक्षक पंकज पाटील यांच्या पथकाने लूटमार करणाऱ्यांचा शोध सुरू केला.

घडलेल्या प्रकाराने गोंधळल्याने स्वप्नील याला आरोपींची शरीरयष्टी व कपड्याबाबत काहीही सांगता येत नव्हते. त्यानंतर घटनास्थळापासून ऐरोली पुलापर्यंतचे कॅमेरे तपासले, परंतु रात्रीची वेळ असल्याने कॅमेऱ्यामध्ये दुचाकी ओळखणे शक्य झाले नाही. ऐरोली व मुलुंड टोलनाक्यावरील कॅमेरे तपासले, परंतु त्यातही काहीच माहिती मिळाली नाही

पोलिसांनी तपास कौशल्य पणाला लावून वारंवार स्वप्नीलकडून माहिती जाणून घेतली. घटनेच्या वेळी बाजूने रस्त्यावरील कचरा साफ करणारी गाडी, छोटा टेम्पो, ट्रक व काही गाड्या गेल्याचे स्वप्नील सांगत होता. त्यानुसार, टोलनाक्यावरील फुटेजमधून कचरा साफ करणाऱ्या गाडीचा क्रमांक मिळाला. या गाडीचा चालक आणि दोन कामगार यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी कचरा गाडीला कॅमेरा असल्याचे सांगितले. कचरा साफ करणाऱ्या गाडीवरील कॅमेऱ्यात मारहाण करणारे दोघे आणि त्यांच्याकडील दुचाकी दिसली. यावरून पोलिसांना तपासाची दिशा मिळाली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #BikeRider#DDNewsMarathi#Looting#MumbaiPolice#MumbaiPuneHighway#डीडीन्यूजमराठी
Previous Post

राज्यात तीन बडे नेते एकत्र येणार?

Next Post

मी १२०० फूट खोल खाणीत चाललोय!

Next Post
मी १२०० फूट खोल खाणीत चाललोय!

मी १२०० फूट खोल खाणीत चाललोय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.