मुंबई प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. ०२ जुन २०२१
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह रजपुत याच्या आत्महत्येला एक वर्ष होऊन गेले. मात्र, त्याच्या आत्महत्येचे ठोस पुरावे किंवा कारण पोलीसांना मिळाले नाही. गेल्या वर्षभरात तपासाला अनेकदा कलाटणी मिळाली आहे. पुन्हा एकदा, तपासाला नवे वळण लागले आहे. या प्रकरणी तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या हाती ड्रग्ज पोहोचवणारा हरीश खान लागला आहे. एनसीबीने वांद्रेमधून त्याला अटक केली आहे.
हरीशसोबत त्याचा भाऊ शाकिब खानला सुद्धा अटक केली आहे. शाकिबवर 19 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. शाकीबला एनसीबीने वांद्रे पोलीसांच्या ताब्यात दिलं आहे. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने नुकतिच सुशांत सिंह राजपूतचा जवळचा मित्र सिद्धार्थ पीठानीला हैदराबादमधून अटक केली होती. तसेच नीरज आणि केशव जे सुशांतचे नोकर होते त्यांची सुद्धा कसून चौकशी केली. या चौकशीनंतर हरीश खान याचं नाव समोर आलं आहे. हरीश खान तोच ज्याच्याकडून सुशांत सिंहपर्यंत ड्रग्ज पोहचवले जात होते.
हरीश त्याच्या भाऊ शकीब खान सोबत वांद्रे परिसरात ड्रग्सचा व्यापार करत होता. हारीश खानला दाऊद बनायचं होतं, दाऊद त्याचा प्रेरणास्त्रोत असून त्याला मुंबईवर दाऊदसारखं अधिराज्य गाजवायचं होतं. अनेकांना तो आपल्या टोळीमध्ये काम करण्यास भाग पाडायचा. लोकांमध्ये आपली दहशत निर्माण करण्यासाठी हरीश खान कधी बंदूक घेऊन फिरायचा तर कधी जिवंत साप घेऊन.
तेंव्हा, हरीश खान व त्याच्या भावाला झालेल्या अटकेनंतर सुशांत सिंह रजपुत प्रकरणाच्या तपासाला वेगळेच वळण येऊ शकतो, एवढे मात्र नक्की.