DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

सुनील गावस्कर यांची संपत्ती आहे किती?

विनोद कांबळीला ते महिन्याला ३० हजार देणार.

DD News Marathi by DD News Marathi
April 19, 2025
in क्रीडा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
सुनील गावस्कर यांची संपत्ती आहे किती?

मुंबई प्रतिनिधी :
दि. १९ एप्रिल २०२५

विनोद कांबळीला प्रत्येक महिन्याला सुनील गावस्कर ३० हजार रुपयांची मदत करणार असल्याचे समोर आले आहे. पण सुनील गावस्कर विनोदला महिन्याला जर तीस हजार रुपये देत असतील, तर त्यांची संपत्ती आहे तरी किती हा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. आता सुनील गावस्कर यांची संपत्ती एकूण आहे तरी किती, हे आता समोर आले आहे.

सुनील गावस्कर हे बऱ्याच वर्षांपासून कॉमेंट्री करत आहेत आणि त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा हा समालोचनामधूनच येतो. सुनील गावस्कर यांनी आतापर्यंत कॉमेंट्री करून जवळपास ३६ कोटी रुपये कमावले आहेत.

सुनील गावस्कर हे फक्त समालोचन करत नाहीत तर त्यांची एक स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीही आहे. १९८५ साली त्यांनी या कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी फक्त खेळाडूंचे मॅनेजमेंट करत नाही तर मोठ मोठे इव्हेंटही आयोजित करते. CEAT क्रिकेट पुरस्कर सोहळ्याचे आयोजन गावस्कर यांची कंपनीच करते. या कंपनीमधूनही सुनील गावस्कर यांची चांगली कमाई होते.

विनोद कांबळीला कठीण काळात त्यांनी मदत केली आहे. सुनील गावस्कर आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून विनोद कांबळीला दर महिन्याला ३० हजार रुपये देणार आहेत. त्यामुळे विनोदला आता प्रत्येक वर्षी ३ लाख ६० हजार रुपये गावस्कर यांच्याकडून मिळणार आहेत.

सुनील गावस्कर हे मुंबईत राहतात, पण त्यांचा गोव्यातील समुद्र किनारी आलिशान बंगला असल्याचे आता समोर आले आहे. या बंगल्याला इस्प्राव्हा विला असे म्हटले जाते. गावस्कर हे तिथे आपली पत्नी मार्शनील आणि मुलगा रोहन गावस्कर यांच्यासोबत राहतात.

सुनील गावस्कर हे गांड्याचे शौकिन आहेत. त्यामुळे सुनील गावस्कर यांच्याकडे एकापेक्षा एक सरस गाड्या आहेत. गावस्कर यांच्याकडे BMW च्या बऱ्याच गाड्या आहेत. BMW 5, BMW 7 सारख्या महागड्या गाड्या त्यांच्या ताफ्यात आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे एमजी हेक्टर प्लस ही गाडीदेखील आहे, जिची किंमत दीड कोटी रुपये आहे.

सुनील गावस्कर यांची संपत्ती ही ३० मिलियन डॉलर असल्याचे म्हटले जात आहे, म्हणजेच २२७ कोटी रुपये एवढी त्यांची प्रापर्टी आहे. यामधील मोठा हिस्सा हा कॉमेंट्री आणि त्यांच्या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीकडून येतो. सुनील गावस्कर यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर काय करायचे, याचा मार्ग सर्वांना दाखवला. बऱ्याच कालावधीपासून ते समालोचन करत असून त्यांची एक मोठी कंपनीही आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #SunilGavaskar#SunilGavaskarWealth#ThirtyMillionDollars#VinodKambli
Previous Post

मुंबई महापालिकेने विलेपार्लेतील ९० वर्षे जुने जैन मंदिर पाडले!

Next Post

संजय बांगर यांच्या मुलाची झाली हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी!

Next Post
संजय बांगर यांच्या मुलाची झाली हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी!

संजय बांगर यांच्या मुलाची झाली हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.