अकोला प्रतिनिधी : मनीष खर्चे
दि. ७ मे २०२५
केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे काल सकाळी ९.४० वाजता शिवनी विमानतळावर आगमन झाले. अकोला – खामगाव राष्ट्रीय महामार्गाची पाहाणी करण्यासाठी ते आले होते. यावेळी प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आ.रणधीर सावरकर, आ.प्रकाश भारसाकळे, आ.वसंत खंडेलवाल आदी उपस्थित होते.
प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे बी .एस साळुंखे यांनी त्यांचे स्वागत केले. उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे,तहसीलदार सुरेश कव्हळे व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते..
बातमी नक्की शेअर करा