छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) प्रतिनिधी : अखलाख देशमुख
दि. ०७ मे २०२५
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक आदेशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी स्वागत केले आहे.
“०३ वर्षांच्या विलंबानंतर या निवडणुका घेण्याच्या निर्णयामुळे लोकशाही अधिक बळकट होणार आहे. नवीन नेतृत्व घडवण्याची ही सुवर्णसंधी आहे,” असे पाटील यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांची तयारी करण्याचे आवाहन केले आहे. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आपण संघटनात्मक बळ वाढवावे आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत,” असे आवाहन त्यांनी केले.