अकोला प्रतिनिधी : मनिष खर्चे
दि, ०७ मे २०२५
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार अकोला जिल्ह्यात दिनांक ७ ते ९ मे २०२५ दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटांसह विजा आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशावेळी आवश्यक ते कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, जनावरांना झाडांना किंवा विजेच्या वायरच्या खाली बांधू नका, दामिनी app चा वापर करा.
दामिनी हे असे ॲप आहे म्हणजे सात मिनिटे 14 मिनिटे आणि 21 मिनिटे आधी वीज पडण्याची सूचना आपल्याला देते. त्या सूचना पाहून आपण स्वतःचा व इतरांचा जीव वाचवण्यासाठी या ॲपचा वापर करू शकता.
सदरचे ॲप हे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत विकसित करण्यात आलेले आहे. गूगल प्ले स्टोरवरुन सदर app डाऊनलोड करता येते, यादरम्यान सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन कक्ष ,जिल्हाधिकारी कार्यालय अकोला, यांचेकडून करण्यात येत आहे,