प्रतिनिधी : अखलाख देशमुख
दि. ०९ मे २०२५
वाढती वाहतूक आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभाग आणि पुणे सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रस्ता सुरक्षा अभियान’ अंतर्गत एक प्रभावी जनजागृती उपक्रम शिमला ऑफिस चौक येथे नुकताच राबवण्यात आला.
या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व पटवून देणे आणि सुरक्षित वाहतुकीला प्रोत्साहन देणे हा होता. या अभियानात फलक हातात घेऊन नागरिकांना संदेश देणे, थेट वाहनचालकांशी संवाद साधून नियमांचे महत्त्व पटवून देणे असे विविध उपक्रम राबवले गेले.
कार्यक्रमाला अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील (IPS), पोलिस उपायुक्त (वाहतूक) अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बालकोटगी, INS TV न्यूजचे प्रतिनिधी राकेश छाजेड, रोटरी क्लब ऑफ कल्याणी नगरच्या नीता राजदान कौल, पोलिस मित्र संघटनेचे राजेंद्र कपोते, सोशल अॅक्टिव्हिस्ट अमित सिंग, इनर व्हील क्लब आणि पुणे सोशल ग्रुपचे सदस्य यांची विशेष उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले.
आयोजकांच्या मते, अशा उपक्रमांमुळे समाजात जबाबदारीची भावना निर्माण होते आणि सुरक्षित वाहतूक संस्कृती रूजवण्यासाठी नागरिकांची सक्रिय भागीदारी सुनिश्चित होते.