दिल्ली प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. ०४ जुन २०२१
भारताचा माजी क्रिकेटपट्टू व भारतीय जनता पार्टीचे खासदार गौतम गंभीर याने त्याच्या गाधीनगर लोकसभा क्षेत्रामध्ये सर्वसामान्य नागरिकांकरिता फक्त १ रुपये मध्ये पोटभर हॅाटेलसारखे पौष्टिक जेवण हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमास ‘एक आशा जन रसोई’ हे नाव देण्यात आले आहे.
या ‘जन रसोई’ मध्ये नागरिकांना स्वादिष्ट आणि पोष्टिक जेवण फक्त १ रुपये मध्ये दिले जात आहे. रोज किमान एक हजार हून अधिक नागरिक याचा लाभ घेत आहेत. शिवाय, येथे जेवण करण्यासाठी उत्तम बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. ‘एक आशा जन रसोई’ या नावाने सुरु केलेल्या गौतम गंभीर च्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणावर कौतूक होत आहे.
समाजातील कोणताही व्यक्ती उपाशी झोपू नये म्हणून हा ‘एक आशा जन रसोई’ उपक्रम सुरु केल्याचे गंभीर याने सांगितले आहे. तसेच, या लोकसभा क्षेत्रात आणखी ५-६ ठिकाणी ‘जन रसोई’ च्या शाखा सुरु करण्याचा त्यांचा विचार आहे.