मुंबई प्रतिनिधी :
दि. १३ मे २०२५
जम्मू काश्मीरमधील पाहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचे प्राण गेले. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अचूक हल्ले करून प्रत्युत्तर दिलं. या कारवाईनंतर भारत-पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे आता युद्धविराम लागू झाला. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची माहिती भारताच्या लष्करानं पुराव्यांसह दिली. पण, पाकिस्तानकडून भ्रामक दावे करण्यात येत आहेत. पाकिस्तानी नागरिक है ‘पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय’ असे म्हणताना दिसून येत आहेत. अशातच आता महानायक अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमधील ओळी सध्याच्या परिस्थितीला तंतोतंत लागू होत असल्याचे चाहते म्हणत आहेत.
बिग बींनी रविवारी आपल्या सोशल मीडिया हँडलवर तुलसीदास रामचरित मानसमधील एक ओळ शेअर केली आहे. ज्यामध्ये शौर्य आणि शत्रू या दोघांबद्दल लिहिलं आहे. ते म्हणाले, “योद्धे युद्धात आपले शौर्य दाखवतात, ते तोंडाने स्वतःची स्तुती करत नाहीत. युद्धात समोर शत्रू दिसताच भित्रे लोक स्वतःच्या शौर्याचा अभिमान बाळगतात.” ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर त्यांचे अनेक चाहते कमेंटही करत आहेत.