मुंबई प्रतिनिधी :
दि. १३ मे २०२५
‘मोहरा’ चित्रपटाने सुनील शेट्टी यांच्या करिअरला नवी दिशा मिळाली. या सिनेमामध्ये रवीना टंडन ही पहिली पसंती नव्हती. मुख्य अभिनेत्रीच्या अचानक मृत्यूमुळे रवीनाला या सिनेमासाठी कास्ट करण्यात आलं. सुनील शेट्टीची या अभिनेत्रीसोबत चांगली मैत्री होती. ‘मोहरा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांशी मजा-मस्करी करायचे. अशातच सुनील शेट्टी यांनी पहलगाम तुरुंगात अभिनेत्रीच्या वागणुकीवर आणि अचानक झालेल्या मृत्यूवर भाष्य केलं आहे.
सुनील शेट्टी यांनी ‘बलवान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, या सिनेमामध्ये ते दिव्या भारतीसोबत दिसले होते. चित्रपट निर्मात्यांना ‘मोहरा’ मध्येही सुनील शेट्टी आणि दिव्या भरती यांची हिट जोडी घ्यायची होती. पण शूटिंगदरम्यान अभिनेत्रीचं निधन झालं. ‘रेडिओ नशा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये, सुनील शेट्टी यांनी पहलगाम तुरुंगात झालेल्या अभिनेत्रीसोबतच्या त्यांच्या शेवटच्या शूटिंगची आठवण शेअर केली.
‘मोहरा’ हा चित्रपट राजीव राय यांनी दिग्दर्शित केला असून हा सिनेमा हिट ठरला. यामध्ये अक्षय कुमार, नसीरुद्दीन शाह आणि रवीना टंडन यांच्याही मुख्य भूमिका होत्या. दिव्याच्या मृत्यूनंतर रवीनाने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. दिव्या तिच्या काळातील सर्वात महागडी अभिनेत्री होती. दिव्याने शोला और शबनम, दिवाना यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलंय. दिव्याचं अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून पडून वयाच्या १९ व्या वर्षी निधन झालं. दिव्या भारतीच्या अचानक निधनामुळं हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. याचा सुनील शेट्टीवर खोलवर परिणाम झाला.
दरम्यान, सुनील शेट्टी यांच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर त्यांचा ‘केसरी वीर’ हा चित्रपट २३ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून या सिनेमातून सूरज पंचोली मोठ्या पडद्यावर पुन्हा पदार्पण करणार आहे. विवेक ओबेरॉय आणि आकांक्षा शर्मा यांच्याही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत.