DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पीएमपीएमएल बसचा प्रवास महागणार!

तिकीट दरात होणार 'इतकी' वाढ.

DD News Marathi by DD News Marathi
May 14, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
पीएमपीएमएल बसचा प्रवास महागणार!

 

 

पुणे प्रतिनिधी :
दि. १४ मे २०२५

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसचा प्रवास दुपटीने महागला आहे. सन २०१४ नंतर प्रथमच दरवाढ झाली आहे. त्यानुसार किमान तिकीट दहा रुपये असेल. पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीत दैनंदिन पास ४० ऐवजी ७० रुपयांना, पीएमआरडीए हद्दीत १२० ऐवजी १५० रुपयांना, तर मासिक पास ९०० रुपयांऐवजी १५०० रुपये असेल.

पीएमपीएमएलच्या तिकिट मशिन्स आणि अन्य यंत्रणांमध्ये बदल केल्यानंतर साधारण पंधरा दिवसांत नवे तिकीटदर लागू होतील. पीएमपीएमएलने यापूर्वीची दरवाढ २० डिसेंबर २०१४मध्ये केली होती. राज्य परिवहन मंडळ, बेस्ट तसेच नागपूर शहर बससेवा यांनी केलेल्या तिकिट दरवाढीच्या आधारावर पीएमपीएमएलने नव्याने दरवाढीचा प्रस्ताव तयार केला होता. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठीच्या पास दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ‘पीएमआरडीए’च्या मासिक पासचा दरही कायम आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च कमी करण्यासाठी कंत्राटी भरती करण्यासही बैठकीत मंजुरी देण्यात आली.

नव्या रचनेनुसार एक ते ३० किलोमीटर अंतरासाठी पाच किलोमीटरच्या अंतराने सहा टप्पे, तर त्यापुढील ३० ते ८० किलोमीटर अंतरासाठी दहा किलोमीटरच्या अंतराने पाच टप्पे अशा एकूण ११ टप्प्यांमध्ये नवीन तिकीटदर निश्चित करण्यात आले आहेत.

नव्या हजार बसची खरेदी
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) लवकरच एक हजार बसची खरेदी करणार आहे. यापैकी पाचशे बस पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका, तर पाचशे बस पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्वतंत्रपणे खरेदी करणार आहे, असा निर्णय मंगळवारी पीएमपीएमएलच्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आला. पुणे महापालिकेचे आयुक्त व ‘पीएमपी’चे संचालक डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही माहिती दिली.

असे असतील दरवाढीचे टप्पे
पहिला टप्पा —५ किलोमीटर – १० रुपये
दुसरा टप्पा —५.१ ते १० – २० रुपये
तिसरा टप्पा —१०.१ ते १५ – ३० रुपये
चौथा टप्पा —१५.१ ते २० – ४० रुपये

नव्या रचनेनुसार पीएमपीएमएल व महामेट्रो सेवेचे एकत्रीकरण अधिक सुसंगत होईल. तसेच ई-तिकीट’ प्रणाली व नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमध्ये सुसंगतता येईल. प्रवासभाडे दर अचूक राहून ही तिकीटरचना प्रवासी व सेवकांना समजण्यास सोपी जाईल. असे डॉ. दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष, पीएमपीएमएल यांनी संगितले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #FareRise#PimpriChinchwad#PMPMLPune
Previous Post

डॉक्टर म्हणाले, “मी तुमच्या माऊलीला बरं करतो, तुम्ही भारतमातेची काळजी घ्या!”

Next Post

छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू!

Next Post
छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू!

छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.