मुंबई प्रतिनिधी :
दि. १७ मे २०२५
बॉलीवूड ड्रग्जचा अड्डा झाल्याच्या चर्चा अनेक वर्षांपासून होत आहेत. काही वर्षांपूर्वी तर दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांचं नावही ड्रग्ज प्रकरणात आलं होतं. आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं बॉलिवूड कलाकार आणि ड्रग्जबद्दल मोठं वक्तव्य केलंय.
सोनाली कुलकर्णीनं बॉलीवूडमधील एक धक्कादायक सत्य उघड केलं आहे. वजन कमी करण्यासाठी कलाकार सर्रासपणे ड्रग्ज घेतात, असा खुलासा तिनं केला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं याबद्दल सांगितलं. सोनाली स्वतःला फिट ठेवण्यासाठी सकस आहार आणि नियमित व्यायाम करते, पण असं काही करण्याला तिचा विरोध आहे.
सोनालीनं म्हटलं की, चित्रपटसृष्टीत वजन कमी करण्याचा ट्रेंड वाढलाय. “मला कल्पना आहे की याची मागणी आहे, कारण मी पडद्यावर काम करते. तुम्ही जितके बारीक असाल, तितके तुम्ही पडद्यावर चांगले दिसता,” . पण या औषध म्हणून घेतलेल्या ड्रग्जमुळे नातेसंबंधांवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, याची चिंता वाटते.
त्या म्हणाल्या, माझ्या अनेक मैत्रिणींना खाल्लेलं अन्न उलट्या करण्याची सवय आहे. त्या वजन कमी करण्याची औषधेही घेत आहेत.” सोनाली पुढं म्हणाली, “मी माझ्या आयुष्यात अशा टप्प्यावर आहे, जिथं मी स्वतःला प्राधान्य देते. मी स्वतःला सांगत असते की ‘मी खास आहे. माझी साइज ही माझी साइज आहे.’ माझ्या आरोग्याची किंमत देऊन मला बारीक व्हायचं नाही.”
“मला वाटतं की आपण हे सगळे कशाच्या किंमतीवर घेत आहोत? जोपर्यंत तुमच्या डॉक्टरांनी (एखाद्या समस्येसाठी) ते लिहून दिलेले नाही, तोपर्यंत तुम्ही ते का घेत आहात? याचा त्रास नेहमी तुमच्या जवळच्या लोकांना होतो,” असंही तिनं म्हटलं.
सोनाली कुलकर्णीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तिची ‘Oops Ab Kya?’ नावाची वेब सिरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. यात श्वेता बासू प्रसाद, आशिम गुलाटी, अभय महाजन, जावेद जाफरी, अपारा मेहता आणि एमी एला यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. तर सुशीला सुजीत हा तिचा मराठी सिनेमाही प्रदर्शित झाला होता.