DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अरबी समुद्रात तयार झाले कमी दाबाचे क्षेत्र, येत्या ३६ तासांत त्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता!

'शक्ती' चक्रीवादळ कोकणला झोडपणार, रायगडात रेड अलर्ट जारी.

DD News Marathi by DD News Marathi
May 24, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
अरबी समुद्रात तयार झाले कमी दाबाचे क्षेत्र, येत्या ३६ तासांत त्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता!

रायगड प्रतिनिधी :
दि. २४ मे २०२५

पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून येत्या ३६ तासांत ते अधिक तीव्र होऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या चक्रीवादळाला ‘शक्ती’ असे नाव देण्यात आले आहे. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून त्याचा थेट फटका कोकण किनारपट्टीला बसेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील तसेच अतिवृष्टीचाही धोका संभवतो. या पार्श्वभूमीवर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबईसह उर्वरित कोकणला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

२०मे पासून पूर्व मोसमी पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. कोकणात, विशेषतः तळकोकणात गेले २ दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील ३ दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असून १५ ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामानविभागाने दिला आहे.

मान्सूनचे वेळेआधी आगमन
अवकाळी पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले असताना आणि शक्ती चक्रीवादळ घोंघावत असताना मान्सूनचे वेळेआधी आगमन होण्याचे संकेत मिळत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस मान्सून कोकण किनारपट्टी काबीज करेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, येत्या काही तासांतच मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणे अपेक्षित आहे. भारतीय कालगणनेनुसार २५ मे ला रोहिणी नक्षत्र सुरू होते आणि रोहिणीचा पाऊस पडतो व तो आगामी मान्सूनचे संकेत देतो असे जाणकार सांगतात. यावर्षी तर २५ मे ला मोसमी पाऊसच दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून या आठवड्यात केरळ, बनर्नाटक, गोवा, महाराष्ट्रातील कोकण आणि गुजरातपर्यंत धडकणार असून या सर्व ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

अपडेट :
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार मान्सून केरळात दाखल झाला आहे. महाराष्ट्रातही मान्सून एक आठवडा आधीच येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Konkan#Maharashtra#Monsoon#Raigarh#RedAlert#ShaktiCyclon
Previous Post

विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला शासनाचे प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

“मी तिला कायमचं संपवून टाकलंय!” पुणं हादरलं!

Next Post
“मी तिला कायमचं संपवून टाकलंय!” पुणं हादरलं!

"मी तिला कायमचं संपवून टाकलंय!" पुणं हादरलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.