DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“मी तिला कायमचं संपवून टाकलंय!” पुणं हादरलं!

पोलीस स्टेशनला जाऊन तरुणाची खळबळजनक कबुली.

DD News Marathi by DD News Marathi
May 24, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
“मी तिला कायमचं संपवून टाकलंय!” पुणं हादरलं!

 

पुणे प्रतिनिधी :
दि. २४ मे २०२५

हडपसर परिसरात तरुणाने प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहराजवळ घडली. खून केल्यानंतर तरुण ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला. अनिता लोंढे (२७) असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून राहुल शिवाजी पिसाळ असं ३२ वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी राहुल पिसाळ हा यवत पोलीस ठाण्यात हजर झाला. मी माझ्या पत्नीचा खून करून आलोय, असं आरोपीने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडे पत्त्याबाबत विचारणा केली असता शेवाळवाडी येथील भंडलकरनगर इथं आपण वास्तव्यास असल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर यवत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ याबाबतची माहिती हडपसर पोलीस ठाण्यात दिली. हडपसर पोलिसांनी भंडलकरनगर इथं जाऊन तपासणी केली असताना अनिता लोंढे ही घरात मृतावस्थेत आढळून आली.

याबाबत माहिती देताना हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले यांनी म्हटलं आहे की, ‘हडपसर परिसरात शेवाळेवाडी येथील भंडलकरनगर येथे ही घटना घडली. अनिता आणि आरोपी राहुल हे एकत्र राहत होते. आरोपीने अनिता हिचा गळा दाबून खून केला आहे. त्यानंतर तो यवत पोलिस ठाण्यात हजर झाला,’ असं संजय मोगले यांनी सांगितलं.

दरम्यान, अनिता लोंढे ही आरोपी राहुल पिसाळ याच्या मामाची मुलगी असून ते दोघे मागील काही काळापासून शेवाळवाडी परिसरात लिव्हइन रिलेशनशीपमध्ये राहात असल्याचे समजते. मात्र दोघांमध्ये झालेल्या वादातून राहुलने तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तो थेट यवत पोलीस ठाण्यात हजर झाला. सध्या आरोपी हा हडपसर पोलिसांच्या ताब्यात असून त्याने अनिता लोंढे हिचा खून कोणत्या कारणातून केला, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Hadapsar#LiveinRelation#MurderPune
Previous Post

अरबी समुद्रात तयार झाले कमी दाबाचे क्षेत्र, येत्या ३६ तासांत त्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता!

Next Post

पीएमपीएमएल बसच्या दरवाढीस आम आदमी पार्टीचा विरोध!

Next Post
पीएमपीएमएल बसच्या दरवाढीस आम आदमी पार्टीचा विरोध!

पीएमपीएमएल बसच्या दरवाढीस आम आदमी पार्टीचा विरोध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.