DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

हिंगणा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात 412 पारधी लाभार्थ्यांना महसूल दाखले वाटप!

पारधी बांधवांना विविध योजनांचा लाभ.

DD News Marathi by DD News Marathi
May 24, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
हिंगणा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात 412 पारधी लाभार्थ्यांना महसूल दाखले वाटप!

हिंगणा प्रतिनिधी : अनिल पवार
दि. २४ मे २०२५ :

हिंगणा तालुक्यातील पारधी बेड्यावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत आयोजित विशेष शिबिरात 412 पारधी विद्यार्थी व बंधूंना विविध महसूल दाखले वाटप करण्यात आले. यात 144 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, 3 नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, 5 डोमीसाईल सर्टिफिकेट, 12 उत्पन्न दाखले, पारधी समाजातील 60 वयोवृद्धांना व विधवा महिलांना संजय गांधी श्रावणबाळ योजनेचा लाभ, 82 राशन कार्ड, 79 आधार, 25 पारधी समाजातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेतून लाभ हिंगणा तहसील कार्यालयामार्फत देण्यात आल्याची माहिती हिंगणा तहसीलदार सचिन कुमावत यांनी दिली .

आदिवासी पारधी विकास परिषदेच्या पुढाकाराने आणि जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन कुमावत यांनी हिंगणा तालुक्यातील सर्व पारधी बेड्यावर विशेष राजस्व या शिबिराचे यशस्वी आयोजन केले.

पारधी समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले. या उपक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या यशस्वी आयोजनाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी विपीन इटनकर आणि तत्कालीन उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, तहसीलदार सचिन कुमावत यांचे, आदिवासी पारधी विकास परिषदेचे विदर्भाध्यक्ष बबन गोरामन, जिल्हाध्यक्ष अनिल पवार, प्रदेश युवा अध्यक्ष अतिश पवार, महासचिव राहुल राजपूत, प्रशांत गोरामन, निकेश माळी, रंजीत भोसले, शिवसाजन राजपूत यांनी विशेष आभार मानले.

तहसीलदार सचिन कुमावत यांनी सांगितले की, पारधी समाजासाठी राबविण्यात आलेल्या या विशेष शिबिरात 412 लाभार्थ्यांना विविध महसूल दाखले हिंगणा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार समीर भाऊ मेघे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे. विविध महसुली दाखल्यापासून अजूनही काही पारधी बांधव वंचित राहिलेले असल्यास पारधी बांधवांसाठी पुन्हा एकदा विशेष शिबिराचे आयोजन हिंगणा तहसील कार्यालयामार्फत करण्यात येईल. पारधी बांधवांना यामुळे आदिवासी पारधी समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक व शैक्षणिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #GovernmentSchemes#Hingana#Paradhi
Previous Post

पारधी समाजाच्या उन्नतीसाठी हॅबिच्युअल ऑफेंडर्स ॲक्ट, 1952 निरस्त करा!

Next Post

आदिवासी पारधी बेडे पाडे मूलभूत गरजांपासून वंचित!

Next Post
आदिवासी पारधी बेडे पाडे मूलभूत गरजांपासून वंचित!

आदिवासी पारधी बेडे पाडे मूलभूत गरजांपासून वंचित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

June 14, 2025
या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

June 13, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.