DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

नागपूर मेट्रोमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे कलाकौशल्याचे सादरीकरण!

बौद्धिक व शारीरिक विकास शिबिराचे यशस्वी आयोजन.

DD News Marathi by DD News Marathi
May 27, 2025
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी, महाराष्ट्र
0
नागपूर मेट्रोमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे कलाकौशल्याचे सादरीकरण!

नागपूर प्रतिनिधी : अनिल पवार
दि. २६ मे २०२५

देवरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत बोरगाव येथील शासकीय आश्रमशाळेत १ ते ३१ मे २०२५ या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक व शारीरिक विकास उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी नागपूर मेट्रो सफर या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये त्यांनी आपल्या कलाकौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.नागपूर मेट्रोच्या प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी समर कॅम्पमध्ये शिकलेल्या कला सादर केल्या. विशेष म्हणजे, त्यांनी धावत्या मेट्रोमध्ये रांगोळीद्वारे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे रेखाचित्र रेखाटले. यासोबतच क्ले आर्ट्सच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा यांची आकर्षक कलाकृती तयार केली. या कलाकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेची प्रशंसा झाली.या प्रसंगी अपर आयुक्त आयुषी सिंग, उपायुक्त दिगंबर चव्हाण, प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, नितीन इसोकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. झाडे, श्री. सोनावणे, श्री. भुसारी, कपिल शर्मा, श्रीम. उईके, मेश्राम आणि मुख्याध्यापक श्री. खेडकर यांनी मेट्रो प्रवासात सहभाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.हे शिबिर आणि अभ्यास दौरा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारीरिक विकासासोबतच त्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणारा ठरला. नागपूर मेट्रोमधील या अनोख्या उपक्रमाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यापक व्यासपीठ मिळाले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #NagpurMetro#TribalStudents#TribalSudentsArt
Previous Post

पुण्यात पावसाची संततधार कायम! पुढील दोन दिवसांसाठी ही स्थिती जैसे थे!

Next Post

महाराष्ट्राच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांची गोंड राणी हिराई आत्राम विविध वस्तू विक्री केंद्राला भेट!

Next Post
महाराष्ट्राच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांची गोंड राणी हिराई आत्राम विविध वस्तू विक्री केंद्राला भेट!

महाराष्ट्राच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांची गोंड राणी हिराई आत्राम विविध वस्तू विक्री केंद्राला भेट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.