DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक!

विकासकामे गुणवत्ता राखून वेळेत पूर्ण करा – खासदार अनुप धोत्रे.

DD News Marathi by DD News Marathi
May 29, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक!

अकोला प्रतिनिधी : मनिष खर्चे
दि २८ मे २०२५ :

केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून जिल्ह्यात रस्ते, स्वच्छता व पाणीपुरवठ्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जातो. विविध विकासकामांचे नियोजन करून सर्व कामे गुणवत्तापूर्ण व विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश खासदार अनुप धोत्रे यांनी आज येथे दिले.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक खासदार श्री. धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिश पिंपळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक अर्जित चांडक,जि प मुख्य कार्यकारी अधिकारी, मनोज जाधव महापालिका आयुक्त सुनील लहाने आदी उपस्थित होते.

खासदार धोत्रे म्हणाले की, पायाभूत सुविधा, आवास योजना व सामान्य माणसाचे जीवनमान सुकर करण्यासाठी अनेकविध योजना केंद्र शासनातर्फे राबवल्या जातात. त्यांची परिपूर्ण अंमलबजावणी व्हावी. कामे कालमर्यादेत पूर्ण झाली पाहिजेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत कृषी निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

शहरांमध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेत व्यसनाधीन व्यक्तींचा वावर आढळतो. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात व्यसनी व्यक्ती टोळक्याने बसलेल्या आढळतात त्यांच्यावर वेळीच कारवाई झाल्यास भविष्यातील चुकीच्या घटना थांबवता येतील, अशीही सूचना त्यांनी केली.

मुर्तीजापुर रेल्वे स्थानकाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत तपासणी आवश्यक असल्याचे आ. पिंपळे यांनी सांगितले. या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करून यामध्ये दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश खासदार श्री. धोत्रे यांनी दिले. पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते खणले जातात. त्याची वेळेत दुरुस्ती होत नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या मुद्द्याकडे आमदार श्री. पिंपळे व आमदार श्री. भारसाकळे यांनी लक्ष वेधले. कुठल्याही कामासाठी ठराविक ठिकाणी रस्ता खणला गेला तर वेळेत दुरुस्ती केली पाहिजे. अशा रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती वेळीच करण्याचे निर्देश खासदार श्री. धोत्रे यांनी दिले. सार्वजनिक प्रसाधनगृहांची कामे गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

यावेळी कृषी सिंचन योजना,मनरेगा, समग्र शिक्षा अभियान, संयुक्त शाळा अभियान, निपुण भारत, राष्ट्रीय पोपण अभियान, पीएम उज्ज्वला योजना, अन्नपूर्णा योजना, ई- नाम पोर्टल, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, जननी शिशु सुरक्षा योजना आदी विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना 25 जून पूर्वी शालेय गणवेशाचे वाटप तसेच मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करावे, अशी सूचना आमदार श्री. पिंपळे यांनी केली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Akola#AnupDhotre
Previous Post

महापुरुषांचा विचार ढणढणत ठेवायचा असेल तर चुलीत सतत विचारांची लाकडं घालावी लागतील! – आमदार सिद्धार्थ खरात.

Next Post

पुण्यात भाजप आमदार भीमराव तपकिरांच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न!

Next Post
पुण्यात भाजप आमदार भीमराव तपकिरांच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न!

पुण्यात भाजप आमदार भीमराव तपकिरांच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.