पिंपरी-चिंचवड प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि.०४ जुन २०२१
खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यामुळेच तालुक्यात आघाडीत वाद निर्माण झाला आहे. आपण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार खेडमध्ये आलो आहोत. पण आमदार दिलीप मोहिते यांचा बंदोबस्त पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी करावा, नाही तर शिवसेनेकडे हा विषय सोपवावा, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत यांनी आज राजगुरूनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. त्यामूळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी खेडच्या महत्वकांक्षी राजकारणामूळे पडल्याचे दिसत आहे. या घटनेवरुन महाविकास आघाडीच्या बिघाडीला सुरुवात झाल्याचे संकेत दिसून येत असल्याचे राजकीय विश्लेषक म्हणणे आहे.
खेडचे विद्यमान आमदार हे शरद पवारांच्या पक्षात राजकारण करण्यासाठी लायक नाहीत. पंचायत समितीच्या जागेवरून आमदार राजकारण करत आहेत, ते परंपरेला धरून नाही. अजितदादांनी सांगूनसुद्धा हे रेटून नेत असतील तर ह्याला सत्तेचा माज आला आहे, असंच म्हणावं लागेल. पंचायत समितीच्या सदस्यांना पळवून नेलं, दहशतीनं पळवून नेलं. त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत हा विषय नेला जाईल; पण हे राजकारण घाणेरडं आहे. पंचायत समिचीचा विषय आमच्यासाठी संपला. शिवसेनेने बांगड्या घातलेल्या नाही. आम्हीही माणसं फोडू शकतो. पण आम्ही नियमांनी बांधल्यामुळे आम्ही तसं काम करणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आमची शरद पवारांवरही श्रद्धा आहे.
आम्ही त्यांच्यापर्यंत आधी जाऊ, त्यानंतर आम्ही काय करायचं हे आम्ही पाहू. दिलीप मोहिते यांची वागणूक अशीच असेल तर महाविकास आघाडी असो की नसो, इथे शिवसेनेचा उमेदवार असेल आणि आताचे दिलीप मोहिते हे माजी आमदार होईल. आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही काय करू शकतो हे दाखवून देऊ. यांना पाडून शिवसेनेचा आमदार निवडून येईल, हा इशारा त्यांच्यासाठी आहे ज्यांनी शिवसेनेच्या वाघाच्या शेपटावर पाय ठेवलाय, अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजयजी राऊत यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला.
बातमी नक्की शेअर करा