DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

वैष्णवी कस्पटे (हगवणे) प्रकरणात कुटुंबियांच्या वकिलावर संतापला अभिनेता हेमंत ढोमे!

पोस्ट करत म्हणाला 'बुरसटलेले आणि चुकीचे पुरुषी विचार...'

DD News Marathi by DD News Marathi
May 29, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
वैष्णवी कस्पटे (हगवणे) प्रकरणात कुटुंबियांच्या वकिलावर संतापला अभिनेता हेमंत ढोमे!

मुंबई प्रतिनिधी :
दि. २९ मे २०२५

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात बुधवारी पार पडलेल्या कोर्टाच्या सुनावणीत हगवणे कुटुंबियांचे वकील विपुल दुशिंग यांनी अनेक खळबळजनक दावे केले. वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवत त्यांनी असा दावा केला की, वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची आणि या प्रकरणातूनच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे. तसेच माध्यमांशी बोलताना त्यांनी असेही म्हटले की, ‘एखाद्या दिवशी भांडणातून पतीने पत्नीवर हात उचलला तर तो घरगुती हिंसाचार म्हटला जात नाही’, ‘एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे हरॅसमेंट ठरत नाही’. अशा वादग्रस्त वक्तव्यांवर हगवणे कुटुंबियांसह या वकिलाविरोधातही आवाज उठवला जातो आहे. याप्रकरणी अभिनेता Hemant Dhome याने केलेल्या पोस्टने लक्ष वेधले.

28 मे रोजी हेमंतने एक्स या प्लॅटफॉर्मवर ही पोस्ट शेअर केली. विपुल दुशिंग यांच्या वक्तव्यासंदर्भातील एका बातमीचे ट्वीट रीट्वीट करत हेमंतने लिहिले की, ‘वकिलावरच केस फाइल करण्याची वेळ आलीय! हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरुषी विचार आता या काळात कोर्टात मांडणेदेखील अवमानकारक आहे… कठीण आहे!’

वैष्णवी हगवणे प्रकरणासंदर्भात हेमंतने याआधीही पोस्ट शेअर करुन संताप व्यक्त केला होता. 22 मे रोजी शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने असे लिहिले होते की, ‘वैष्णवी कस्पटे (मुळ नाव) आणि तेच वापरावं! ज्या आडनावाने तिचा बळी घेतला ते नकोच! या आपल्या बहिणीचा आजच्या काळात हुंडाबळी गेलाय! गेली अनेक वर्ष तिचा छळ झालांय. चूक दोन्ही बाजूची आहे… सासरकडच्यांची आणि हुंडा देणाऱ्या आईबापाची सुद्धा. लवकरात लवकर कठीण कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे आपल्या महाराष्ट्रात तरी अशा घटना होऊ नयेत म्हणून आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे.’

पुण्यातील मुळशी तालुक्यामधील भुकूम याठिकाणी 16 मे रोजी वैष्णवी कस्पटे-हगवणे हिने आयुष्याचा शेवट केला. याप्रकरणी सासरच्या मंडळींवर वैष्णवीचा छळ करण्यात आल्याचा आरोप झाला असून, पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली. या आरोपींची कोठडी संपल्यानंतर बुधवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी असे वादग्रस्त दावे केले आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #HemantDhome#VaishnaviHagavne#VaishnaviKaspate#VipulDushing
Previous Post

पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत!

Next Post

उदयनगरात एलसीबीची मोठी कारवाई : ११ किलो गांजा जप्त!

Next Post
उदयनगरात एलसीबीची मोठी कारवाई : ११ किलो गांजा जप्त!

उदयनगरात एलसीबीची मोठी कारवाई : ११ किलो गांजा जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

June 14, 2025
या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

June 13, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.