पुणे प्रतिनिधीः
महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि मालमत्तांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्त केला.
सीबीआयने आज अनिल देशमुख यांचे घर व मालमत्तेच्या १० ठिकाणी छापे टाकले आहेत. आज सकाळी ७ च्या दरम्यान सीबीआयची टिम अनिल देशमुख यांच्या घरी पोहचली आहे. सीबीआय ने आज टाकलेल्या छाप्यामूळे अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्याचे दिसत आहे.
बातमी नक्की शेअर करा