DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

दीपक मानकरांना पोलिसांचा पुन्हा दणका!

मुलावरही झाला गुन्हा दाखल.

DD News Marathi by DD News Marathi
May 30, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
दीपक मानकरांना पोलिसांचा पुन्हा दणका!

पुणे प्रतिनिधी :
दि. ३० मे २०२५

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आता त्यांचे पुत्र करण मानकर आणि व्याही सुखेन शहा यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. समर्थ पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत. शंतनू कुकडे नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यातील संशयास्पद व्यवहारामुळे हे प्रकरण उघडकीस आले. कुकडेच्या खात्यातून मानकर पिता-पुत्रांच्या खात्यात आणि सुखेन शहा यांच्या खात्यात मोठी रक्कम वर्ग झाली होती. या संदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दोन गुन्हे दाखल झाले आहेत. एका गुन्ह्यात शंतनू सॅम्युअल कुकडे, सुखेन सुरेशचंद्र शहा, रौनक भरत जैन आणि इतर काही जणांचा समावेश आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात शंतनू सॅम्युअल कुकडे, करण दीपक मानकर आणि इतरांना आरोपी करण्यात आले आहे. शंतनू कुकडे याच्यावर एका विदेशी तरुणीला आश्रय देण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये आधीच पाच गुन्हे दाखल आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या बँक खात्यात तब्बल १०० कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.

पोलिसांनी केलेल्या तपासात असे समोर आले आहे की, कुकडेच्या बँक खात्यातून मानकर पिता-पुत्रांच्या खात्यात सुमारे पावणेदोन कोटी रुपये वर्ग झाले होते. तसेच, करण मानकर यांचे सासरे सुखेन शहा यांच्या खात्यात तब्बल सहा कोटी ५२ लाख रुपये वर्ग झाले आहेत. या व्यवहारांबाबत पोलिसांनी मानकर यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी कुकडेसोबत जमीन खरेदीचा कोणताही व्यवहार झाला नसल्याचे सांगितले. त्यांनी काही कागदपत्रे सादर केली, पण ती बनावट असल्याचे पोलिसांना आढळून आले.

सुखेन शहा यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचा मुलगा सिद्धांत मुळशी येथे १० एकर जागेवर रिसॉर्ट बनवणार होता. त्यासाठी शंतनू कुकडेने ५ कोटी २२ लाख रुपये आणि रौनक जैनने १ कोटी ३० लाख रुपये गुंतवले होते. त्यांनी या संदर्भात स्टॅम्प पेपरवर केलेला करारही सादर केला. मात्र, पोलिसांनी तपासणी केली असता तो करारही बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे सुखेन शहा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल, अशी शक्यता आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DeepakMankar#Fraud#KaranMankar#Resort#SamarthaPoliceStationPune
Previous Post

उदयनगरात एलसीबीची मोठी कारवाई : ११ किलो गांजा जप्त!

Next Post

बाळ दत्तक दिले केवळ १०० रुपयांच्या बॉन्डपेपरवर!

Next Post
बाळ दत्तक दिले केवळ १०० रुपयांच्या बॉन्डपेपरवर!

बाळ दत्तक दिले केवळ १०० रुपयांच्या बॉन्डपेपरवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.