DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

बाळ दत्तक दिले केवळ १०० रुपयांच्या बॉन्डपेपरवर!

आठ जणांविरोधात गुन्हा दाखल.

DD News Marathi by DD News Marathi
May 30, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
बाळ दत्तक दिले केवळ १०० रुपयांच्या बॉन्डपेपरवर!

उदगीर प्रतिनिधी :
दि. ३० मे २०२५

शंभर रुपयांच्या बॉन्डवर बेकायदेशीरपणे दीड वर्षाच्या बाळाला दत्तक पत्र करून दिल्याप्रकरणी आठ जणांविरोधात उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे यांनी उदगीर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार दहा ते बारा सप्टेंबर दरम्यान उदगीर येथे आरोपी परविन अलाउद्दीन पिंजारी यांची मुलगी मेहक हिने जन्म दिलेले बाळ महबूब यास आरोपी जमीन अहमद बागवान व अहमदनगर बागवान यांनी शंभर रुपयांच्या बॉन्ड पेपरवर बेकायदेशीरपणे दत्तक पत्र करून दिले. यासह अन्य लोकांनी बॉन्डवर सह्या केल्या आहेत. यामुळे उदगीर शहर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुटुंबातील असलेली अडचण दूर व्हावी यासाठी दत्तक दिले असल्याची कबुली परविन पिंजारी यांनी दिली आहे. आधीच तीन मुली त्यानंतर ही चौथी मुलगी झाली यामुळे हे बाळ शंभर रुपयांच्या बॉन्डवर दत्तक पत्र करून कायदेशीर रित्या दत्तक दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इतक्या बाळांचा सांभाळ करण्यासाठी होणारा खर्च परवडणारा नसल्याकारणाने आम्ही दत्तक दिले असल्याची कबुली पोलीस ठाण्यातील चौकशीमध्ये परवीनने दिली आहे. आम्हाला हे सर्व कायद्याने गुन्हा ठरतो हे माहीत नसल्यामुळे आम्ही असे दत्तक पत्र केले आहे असे, आरोपी महिलेचे म्हणणे आहे.

लातूरमधील या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. आरोपींनी हे देखील स्पष्ट केले की, अगोदरच तीन मुली असताना परत ही मुलगी झाली आणि सर्व पालनपोषण करणे शक्य होत नसल्याचे त्यांनी सांगितले. याशिवायच त्यांचे म्हणणे आहे की, अशाप्रकारे बाळ दत्तक करणे गुन्हा असल्याची आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती. मात्र, या प्रकारामुळे खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शंभर रुपयांच्या बॉन्ड पेपरवर त्यांनी सह्या केल्या होत्या.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Adoption#Muslims#Udgir#UdgirPolice
Previous Post

दीपक मानकरांना पोलिसांचा पुन्हा दणका!

Next Post

श्रेयस बाद होताच गावस्कर संतापून नको ते बोलून बसले!

Next Post
श्रेयस बाद होताच गावस्कर संतापून नको ते बोलून बसले!

श्रेयस बाद होताच गावस्कर संतापून नको ते बोलून बसले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.