DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अकोल्यात किरकोळ वादातून निर्घृण खून!

फरार आरोपीस एका तासातच केली अटक.

DD News Marathi by DD News Marathi
June 3, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
अकोल्यात किरकोळ वादातून निर्घृण खून!

अकोला प्रतिनिधी : मनिष खर्चे
दि. ०३ जून २०२५

शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार २ जून रोजी रात्री कुदळीने डोक्यात प्रहार करून एका व्यक्तीची निघृण हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव संजय यश कौशल असून आरोपी महेंद्र पवार फरार आहे. पोलीस तपास युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अकोला शहरातील गजबजलेल्या आणि वस्तीवाढीच्या टप्प्यावर असलेल्या रणपिसे नगर जागृती शाळेजवळील परिसरात सोमवार 2 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडलेली ही थरारक हत्या संपूर्ण परिसराला हादरवून गेली. संजय कौशल (फ्लॅट नं. ३०२) हे मुरलीधर टॉवरमध्ये राहत होते, तर आरोपी महेंद्र पवार (फ्लॅट नं. ३०६) हा देखील याच इमारतीत राहतो. दोघांमध्ये आधीपासूनच किरकोळ वाद होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. रात्री ८ वाजता पुन्हा एकदा वाद उफाळून आला. आधीच्या भांडणात हाणामारी झाली आणि अचानक महेंद्र पवारने ताब्यातील कुदळीने संजय कौशल यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. रक्ताच्या थारोळ्यात संजय कौशल खाली कोसळले. स्थानिकांनी तत्काळ त्यांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या खून प्रकरणानंतर आरोपी महेंद्र पवार घटनास्थळावरून फरार झाला होता, त्याचा शोध घेण्यासाठी सिव्हिल लाईन पोलीस सक्रिय झाले. घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम, वरिष्ठ पोलीस अधिकारी, आणि गुन्हे शाखा तपासासाठी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेत अखेर आरोपी महेंद्र पवार यास अटक केली असून फॉरेन्सिक तपासाद्वारे हत्येच्या आधी आणि नंतरच्या घटनाक्रमाचा तपास करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, वादाचे नेमके कारण वैयक्तिक व शेजारी संबंधांतील वाद असल्याचे सांगितले जात आहे. . घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते. शहराच्या मध्यवर्ती व गजबजलेल्या परिसरात अशा प्रकारची हत्या घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. मुरलीधर टॉवर सारख्या निवासी संकुलात देखील सुरक्षा यंत्रणेचा अभाव आणि प्रशासनाचे दुर्लक्ष समोर येत आहे. पोलीस खात्याने लवकरात लवकर परिसरात सतर्कता वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Akola#MurderCase
Previous Post

तर पाकिस्तानचे चार तुकडे व्हायला वेळ लागला नसता – राजनाथ सिंह!

Next Post

कळमेश्वर तालुक्यातील 284 पारधी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप!

Next Post
कळमेश्वर तालुक्यातील 284 पारधी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप!

कळमेश्वर तालुक्यातील 284 पारधी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.