DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

कळमेश्वर तालुक्यातील 284 पारधी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप!

क्रांतिवीर समशेर सिंग पारधी शिक्षण जागर यात्रेच्या लढ्याला यश.

DD News Marathi by DD News Marathi
June 3, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
कळमेश्वर तालुक्यातील 284 पारधी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप!

कळमेश्वर (नागपूर) प्रतिनिधी : अनिल पवार

दि. २ जून २०२५ :

कळमेश्वर तालुक्यातील पारधी समाजाच्या 284 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. आदिवासी पारधी विकास परिषदेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि क्रांतिवीर समशेर सिंग पारधी शिक्षण जागर यात्रेच्या माध्यमातून केलेल्या मागणीला यश मिळाले. परिषदेचे विदर्भाध्यक्ष बबन गोरामन, प्रदेश युवा अध्यक्ष अतिश पवार आणि नागपूर जिल्हाध्यक्ष अनिल पवार, उपाध्यक्ष सतीश माळी यांच्या नेतृत्वाखालील प्रयत्नांनी हे यश शक्य झाले.

पारधी समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राअभावी शिक्षण अर्धवट सोडावे लागत होते. नागपूर जिल्ह्यातील 42 पारधी बेड्यांवर शिक्षण जागर यात्रेद्वारे ही समस्या उजेडात आली. याची दखल घेत राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी विपिन इटनकर, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांच्यासमवेत आढावा बैठक घेऊन त्वरित पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री बावनकुळे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर उपविभागीय अधिकारी संपत खलाटे आणि कळमेश्वर तहसीलदार रोशन माकवाने व आदिवासी पारधी विकास परिषदेच्या शिष्टमंडळानी पारधी बेड्यांच्या गावांना भेटी दिल्या.

कळमेश्वर तालुक्यातील पारधी बेड्यावर विशेष राजस्व शिबिर आयोजित करून 284 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रे निर्गमित करून महसूल अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन वाटप केले, असे तहसीलदार माकवाने यांनी सांगितले. या यशाबद्दल आदिवासी पारधी विकास परिषदेने मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री बावनकुळे, जिल्हाधिकारी इटनकर, उपविभागीय अधिकारी खलाटे आणि तहसीलदार माकवाने यांचे आभार मानले. या यशामुळे पारधी समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होणार आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #CasteCertificate#Kalameshwar#Nagpur#Paradhi
Previous Post

अकोल्यात किरकोळ वादातून निर्घृण खून!

Next Post

“मी बाहेर पडतो”, गिरीश महाजनांचा निरोप आला होता!

Next Post
“मी बाहेर पडतो”, गिरीश महाजनांचा निरोप आला होता!

"मी बाहेर पडतो", गिरीश महाजनांचा निरोप आला होता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.