कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगाला हैराण करुन सोडले आहे. आज मोठमोठ्या महासत्ता सुद्धा या महामारीच्या संकटाने भयभीत झाल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुस-या लाटेचा सर्वाधिक फटका भारताला आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राला बसला आहे. पहिल्या लाटे प्रमाणे दुस-या लाटेचा केंद्रबिंदू ही पुणे ठरला. पुण्यात गेल्या एक दिड महिन्यात कोरोनाच्या संकटाने हाहाकार माजला होता. हा काळ एवढा गंभीर होत की, कोरोनाग्रस्त रुग्णांना बेड उपलब्ध नव्हते, ऑक्सिजनची कमतरता होती, रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नव्हते एवढचं काय तर हॅास्पिटल मध्ये रुग्णांना उपचारा करीता जागा ही उपलब्ध होत नव्हती.
संपूर्ण पुणे शहरात सगळीकडे भयानक परिस्थिती आणि कोरोनाचा कहर सुरु असताना, हांडेवाडी येथे एका संवेदनशील अवलीयाने सामाजिक भान ठेऊन स्वःखर्चातून सर्वात पहिले कोविड हॅास्पिटल सुरु केले. त्या कोविड हॅास्पिटलचे नाव होते, ‘मातोश्री आरोग्य मंदिर, हांडेवाडी’.हे कोविड हॅास्पिटल एकूण ५० बेड चे होते. त्यापैकी २५ ऑक्सिजन बेड व २५ आयसोलेशन बेड होते. याशिवाय, इतर सर्व अत्याधुनिक सेवा सुविधा या कोविड हॅास्पिटल मध्ये उपलब्ध करुन दिल्या होत्या. राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या शुभहस्ते या मातोश्री आरोग्य मंदिर, कोविड हॅास्पिटलचे उद्धघाटन करण्यात आले. या कोविड हॅास्पिटलच्या माध्यमातून हजारो कोरोना रुग्णांना आधार मिळाला. विशेष म्हणजे, हा निमशहरी भाग असल्याने अनेक सर्वसामान्य नागरिकांना या कोविड हॅास्पिटलचा फार मोठा लाभ झाला.
या रुग्णसेवक अवलीयाचे नाव आहे, उल्हास शेवाळे. ते उरळी देवाची या गावचे माजी सरपंच आहेत. सध्या ते पुणे शहरात शिवसेनेचे उपशहर प्रमुख म्हणून काम करीत आहेत. उल्हास शेवाळे हे गेल्या १० वर्षाहून जास्त काळ सामाजिक क्षेत्रात कार्यररत आहेत. ते नागरिकांच्या संकट काळात सदैव मदतीला धावून जात असतात. प्रत्येकाला आपल्या घरातील सदस्य वाटावा अशी त्यांच्या कामाची पद्धत आहे.
स्वःखर्चातून पहिले कोविड हॅास्पिटल सुरु करुन ही उल्हास शेवाळे शांत बसले नाहीत. या संपूर्ण कोरोना काळात त्यांनी अनेक उपक्रम राबवून नागरिकांना दिलास देण्याचं काम केलं आहे. नागरिकांना मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. कोरोनाच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण मिळावे म्हणून कोरोना विषाणू निर्जंतूकीकरण औषध फवारणी केली. विशेष करुन जिथे कोरोना रुग्ण सापडले आहेत, त्या संक्रमीत ठिकाणी निर्जंतुकीकरण औषधाची मोठ्या प्रमाणावर फवारणी केली. उरळी देवाची, फुरसुंगी, औताडेवाडी, हांडेवाडी व होळकरवाडी येथे या निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी करण्यात आली.
घरोघरी जाऊन रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या. ही टेस्ट घेण्यासाठी ६ डॉक्टर्स स्पेशल टिम, कार्यकर्त्यांची टिम व सोबतीला रुग्णवाहिका अशी चोख व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, नागरिक ही टेस्ट करायला घाबरत असताना प्रत्येक घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये टेस्टबाबत जनजागृती करण्यात आली. टेस्ट मध्ये पॅाझिटिव्ह सापडलेल्या कोरोना रुग्णांवर सुरु केलेल्या कोविड हॅास्पिटल मध्ये विनामुल्य उपचार केले. या रॅपिड अँटीजन टेस्टिंग व्दारे जवळपास साडेचार हजारांहून अधिक नागरिकांची टेस्ट करण्यात आली. तसेच, मोफत कोविड लस देऊन नागरिकांना दिलासा दिला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे लॅाकडाऊन करण्यात आल्याने गरीब व गरजूंना अन्नधान्य वाटप केले. ज्यामध्ये रेशनिंगचे किट, तांदुळ, गहू व भाजीपाला मोफत दिला. स्वतःचा वाढदिवस आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करुन कोरोना रुग्णांना रक्त उपलब्ध करुन दिले. तसेच, कोविड काळात वृद्धाश्रमामध्ये भेट देऊन त्या निराधार जेष्ठांना अन्नधान्य वाटप केले. कोविड मध्ये परिसरातील निराधार व भिकारी यांना शिजवलेल्या अन्नांची पाकिटे वाटप केली.
सर्वात महत्वाचे म्हणजे, उल्हास शेवाळे यांनी कोविड आटोक्यात आणण्यासाठी राबविलेल्या उपक्रमामूळे परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी सुरु केलेल्या कोविड हॅास्पिटल मध्ये आज रोजी एक ही रुग्ण उपचार घेण्याकरिता नाही हीच त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती होय. उल्हास शेवाळे यांनी कोरोना संकटात केलेल्या कामाचे परिसरात मोठ्या प्रमाणावर कौतूक होत आहे. तेंव्हा, अशा या संवेदनशील कोविड योद्ध्याला खरंच आमचा सलाम.
उल्हास शेवाळे याविषयी बोलताना म्हणाले, “दुस-या लाटेत अचानक सगळीकडे वाढलेल्या कोरोना रुग्णांमूळे विस्फोटक परिस्थिती बनली होती. बेड, ऑक्सिजन व इंजेक्शन साठी चाललेली धावाधाव आणि त्यातून रुग्णांची होणारी परवड याचा विचार मला शांत झोपू देत नव्हता. आपण या एवढ्या मोठ्या संकटात नागरिकांसाठी काहीच करु शकलो नाही तर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही असे वाटले. तेंव्हा, मनात ठरवले आणि केवळ ७ दिवसात कोविड हॅास्पिटल सुरु केले. त्यानंतर परिसरातील प्रत्येक कोरोना रुग्ण आपल्या घरातील आहे समजून त्यासाठी काम केले. परिसराची काळजी म्हणून इतर अनेक उपक्रम राबविले. आज कोरोना रुग्णसंख्या मंदावली आहे. हे पाहून आपण केलेल्या कामाचे चीज झाले असे वाटत आहे.”
समाजाला गरज असताना तुमि केलेलं काम कौतुकपूर्ण आहे असेच काम करा पुढे नगरसेवक होणार