DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

उमरेड तालुका हळहळला : नायब तहसीलदार प्रदीप वरपे यांच्या बदलीने नागरिकांमध्ये असंतोष!

"असा अधिकारी पुन्हा होणे नाही" अशी सार्वत्रिक भावना.

DD News Marathi by DD News Marathi
June 5, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
उमरेड तालुका हळहळला : नायब तहसीलदार प्रदीप वरपे यांच्या बदलीने नागरिकांमध्ये असंतोष!

उमरेड प्रतिनिधी : अनिल पवार
दि. ५ जून २०२५ :

उमरेड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रदीप वरपे यांच्या नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बदलीमुळे उमरेड तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी आणि असंतोष पसरला आहे. आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी करून नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या वरपे यांच्या बदलीमुळे “असा अधिकारी पुन्हा होणे नाही,” अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

प्रदीप वरपे यांनी उमरेड तहसील कार्यालयात अनेक प्रशंसनीय उपक्रम राबवले. संजय गांधी योजना ऑनलाइन पद्धतीने सुरू करून वयोवृद्धांना सोयीस्कर सेवा प्रदान केली. सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांच्या परवानग्या एक खिडकी योजनेअंतर्गत सहज उपलब्ध करून दिल्या. गावागावात राजस्व शिबिरांचे आयोजन करून हजारो ग्रामस्थांना गावातच विविध दाखले मिळवून दिले. विशेषत: पारधी समाजासाठी पारधी बेड्यावर शिबिरे आयोजित करून त्यांना दाखले मिळवण्यास मदत केली.कोरोना काळात त्यांनी तालुका कंट्रोल रूम एकहाती सांभाळत १२०० परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

शेतकऱ्यांच्या ७/१२ च्या अडचणी सोडवण्याबरोबरच रस्ते आणि पांधन रस्ते मोकळे करून त्यांना दिलासा दिला. विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. PM Kisan, AgriStack आणि ऑनलाइन ७/१२ यासारख्या योजनांद्वारे तहसील कार्यालयाचे कामकाज आधुनिक आणि पारदर्शक केले. तहसील कार्यालयापुरते मर्यादित न राहाता, इतर विभागांशी संबंधित समस्याही त्यांनी सोडवल्या, ज्यामुळे “तहसील कार्यालय म्हणजे वरपे साहेब” अशी धारणा नागरिकांमध्ये निर्माण झाली.वरपे यांच्या बदलीमुळे तालुक्यातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या लोकाभिमुख आणि कार्यक्षम कामगिरीमुळे तहसील कार्यालयाने नवे मानदंड प्रस्थापित केले. अशा अधिकाऱ्याची पोकळी भरून काढणे आव्हानात्मक असेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले. स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की, भविष्यातही उमरेडला असे कार्यक्षम आणि लोकाभिमुख अधिकारी मिळावेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #PradeepVarape#Umred
Previous Post

उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार?

Next Post

आरसीबीच्या विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगाराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू!

Next Post
आरसीबीच्या विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगाराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू!

आरसीबीच्या विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगाराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.