DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

आदिवासी पारधी विकास परिषदेने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे केले अभिनंदन!

समाज उन्नतीसाठी पारधी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर.

DD News Marathi by DD News Marathi
June 9, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
आदिवासी पारधी विकास परिषदेने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे केले अभिनंदन!

नागपूर प्रतिनिधी : अनिल पवार
दि. ८ जून २०२५ :

नागपूर जिल्ह्यातील पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक उत्थानासाठी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल आदिवासी पारधी विकास परिषदेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन हार्दिक अभिनंदन केले. बावनकुळे यांच्या संवेदनशील नेतृत्वाखाली पारधी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी राबविलेल्या योजनांचे परिषदेने कौतुक केले. यावेळी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदनही त्यांना सादर करण्यात आले.

आदिवासी पारधी विकास परिषदेने आपल्या निवेदनात नमूद केले की, महसूल पालकमंत्री बावनकुळे यांनी हजारो पारधी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आणि बेडे पाड्या वस्त्यांवर आदिवासी विकास विभागामार्फत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी घेतलेला पुढाकार अतुलनीय आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे पारधी समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी मोलाची मदत झाली असून, कल्याणकारी योजनांमुळे समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे. परिषदेने बावनकुळे यांच्या कार्याला सलाम करत भविष्यातही त्यांच्या सहकार्याने समाजविकासासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

या भेटीदरम्यान आदिवासी पारधी विकास परिषदेने काही महत्त्वपूर्ण मागण्या बावनकुळे यांच्यासमोर मांडल्या. यामध्ये 1952 चा सरायीत गुन्हेगार कायदा (हॅबीच्यूअल ऑफेंडर्स कायदा) रद्द करणे व महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्यांमध्ये आदिवासी पारधी समाजातील उच्चशिक्षित व्यक्तीची अशासकीय पदावर नियुक्ती करण्याची मागणी तसेच पारधी समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि न्यायिक समस्यांवर चर्चेसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्याची विनंती समाविष्ट आहे. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानातून सर्व जिल्ह्यातील पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड मतदार नोंदणी, आदी महसूल दाखले, राहत्या घरांचे मालकी हक्क, तसेच वन, गायरान आणि कसत असलेल्या शेतजमिनींचे मालकी हक्काचे पट्टे प्रदान करण्याची मागणी करण्यात आली. राज्यातील सर्व पारधी बेड्यांवर पायाभूत सुविधा पुरविण्याचाही आग्रह आदिवासी पारधी विकास परिषदेने धरला.

या भेटीत आदिवासी पारधी विकास परिषदेचे विदर्भाध्यक्ष बबन गोरामन, उपाध्यक्ष मंगल भोसले, युवा प्रदेशाध्यक्ष अतिश पवार, नागपूर जिल्हाध्यक्ष अनिल पवार, महासचिव राहुल राजपूत, शिवसाजन राजपूत यांच्यासह परिषदेचे शिष्टमंडळ उपस्थित होते. शिष्टमंडळाने राज्याचे महसूल व पालकमंत्री बावनकुळे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत अभिनंदन पत्राद्वारे त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

आदिवासी पारधी विकास परिषदेच्या या भेटीने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पारधी समाजाच्या विकासासाठी असलेल्या बांधिलकीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जाणाऱ्या योजनांनी समाजात सकारात्मक बदल घडवले असून, या प्रयत्नांना परिषदेने प्रेरणादायी म्हटले आहे. ही भेट पारधी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ChandrashekharBavankule#ParadhiSamaj
Previous Post

आरसीबीच्या विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगाराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू!

Next Post

मुंब्रा स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून १० ते १२ प्रवासी पडले!

Next Post
मुंब्रा स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून १० ते १२ प्रवासी पडले!

मुंब्रा स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून १० ते १२ प्रवासी पडले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा स्वतःच्या आमदारावर संताप!

फडणवीसांचा स्वतःच्या आमदारावर संताप!

December 10, 2025
“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

December 10, 2025
जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

December 10, 2025
महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

December 10, 2025
बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.