DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

खाजगी शाळांमधील अतिरिक्त शुल्कवसुलीविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी!

मनोज जाधव, विदर्भ दूत जिल्हा प्रतिनिधी यांचे गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन.

DD News Marathi by DD News Marathi
June 9, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
खाजगी शाळांमधील अतिरिक्त शुल्कवसुलीविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी!

चिखली प्रतिनिधी : सतीश पैठणे

दि. ६ जून २०२५ :
चिखली तालुक्यातील अनेक नामांकित तसेच नव्याने स्थापन झालेल्या खाजगी शाळा व महाविद्यालयांकडून शासन निर्देशांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर व अनावश्यक अतिरिक्त शुल्क वसूल केले जात असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ दूतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज जाधव यांनी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती चिखली यांना निवेदन देत तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.

निवेदनातील प्रमुख मुद्दे –

प्रवेशासाठी डोनेशनच्या नावाखाली मोठ्या रक्कमांची मागणी

ठराविक दुकानदारांकडून युनिफॉर्म, शूज, बॅग, पुस्तकं घेण्यास सक्ती

स्मार्ट क्लास, संगणक, अ‍ॅक्टिव्हिटी फीच्या नावाखाली अवाजवी शुल्क

ट्रान्सपोर्ट सेवेसाठी अनियंत्रित दर आकारणी

जादा परीक्षा शुल्क व इव्हेंट फी पालकांच्या संमतीशिवाय घेतली जाते

फीची अधिकृत पावती न देणे व पारदर्शक माहितीचा अभाव

मनोज जाधव यांनी निवेदनात स्पष्टपणे सांगितले की, शिक्षण हा मूलभूत हक्क असून, त्याचा व्यावसायिकीकरण रोखण्याची जबाबदारी शासन यंत्रणेवर आहे. या बेकायदेशीर वसुलीमुळे मध्यमवर्गीय व गरीब पालक आर्थिक संकटात सापडले असून, मुलांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होत आहे.

मागण्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे –

अशा शाळांची चौकशी करून किती शुल्क घेतले जाते, याची माहिती घेणे

दोषी आढळलेल्या शाळांवर कठोर कारवाई

प्रत्येक शाळेने शासननिर्दिष्ट फी संरचना फलकावर प्रसिद्ध करणे बंधनकारक करणे

पालकांच्या तक्रारींसाठी हेल्पलाइन किंवा ग्रिव्हन्स सेल सुरू करणे

फीविषयीची सर्व माहिती ऑनलाईन पोर्टलवर पारदर्शकपणे उपलब्ध करून देणे.

“शासनाने शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले असताना काही शाळा हेच उद्दिष्ट उध्वस्त करत आहेत,” असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आपण या गंभीर प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराल, अशी अपेक्षा मनोज जाधव यांनी व्यक्त केली आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Donation#EducationOfficer#SchoolFees
Previous Post

मुंब्रा स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून १० ते १२ प्रवासी पडले!

Next Post

बदलापूर, अंबरनाथमध्ये चहा, पान टपऱ्यांवर ड्रग्जची राजरोस विक्री!

Next Post
बदलापूर, अंबरनाथमध्ये चहा, पान टपऱ्यांवर ड्रग्जची राजरोस विक्री!

बदलापूर, अंबरनाथमध्ये चहा, पान टपऱ्यांवर ड्रग्जची राजरोस विक्री!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीनगरमधील चकमकीत पहलगाम हल्ल्यातील तीन संशयित दहशतवाद्यांना कंठस्नान!

श्रीनगरमधील चकमकीत पहलगाम हल्ल्यातील तीन संशयित दहशतवाद्यांना कंठस्नान!

July 28, 2025
ठाकरे बंधू एकत्र लढल्यास भाजपची स्थिती अवघड!

ठाकरे बंधू एकत्र लढल्यास भाजपची स्थिती अवघड!

July 28, 2025
भारताच्या एका रणनीतीमुळे सामना फिरला!

भारताच्या एका रणनीतीमुळे सामना फिरला!

July 28, 2025
पुण्यात आणखी एक रेव्ह पार्टी प्रकरण!

पुण्यात आणखी एक रेव्ह पार्टी प्रकरण!

July 28, 2025
हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बंगलोर-हैदरबादला चाललंय!

हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बंगलोर-हैदरबादला चाललंय!

July 26, 2025
लाडकी बहीण योजनेचा लाभ १४ हजारहून अधिक पुरुषांनी लाटला !

लाडकी बहीण योजनेचा लाभ १४ हजारहून अधिक पुरुषांनी लाटला !

July 26, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.