नागपूर प्रतिनिधी : अनिल पवार
दि. १० जून २०२५
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ विभागातर्फे जननायक बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त अंबाझरी टेकडी, नागपूर येथील क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सूर्यकांत उईके, विदर्भ अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद उपस्थित होते. यावेळी दिनेश शेराम, जनरल सेक्रेटरी, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ विभाग, प्रमुख अतिथी राहुल मसराम, माजी उपसभापती, मुकुंदा उईके, माजी नगरसेवक, सरस्वती ताई सलाम, माजी नगरसेविका, शंभू गोंड कोहचाडे, वनश्री ताई सिडाम, केंद्रीय महिला सचिव, रंजना पुरके, विजय परतीके, राहुल मडावी, सुरेंद्र नैताम, यशवंत मसराम, राम कोडापे, शाम कोडापे, राहुल खंडाते, विक्रांत सलाम, गोपीचंद गेडाम, रविंद्र पुरकाम आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात बिरसा मुंडा यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची आठवण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या क्रांतिकारी विचार आणि आदिवासी समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला.