DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

चाट विकायला ही व्यक्ती चक्क BMW कारने येते!

रस्त्याच्या कडेला दुकान, पण बनली करोडपती.

DD News Marathi by DD News Marathi
June 11, 2025
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी
0
चाट विकायला ही व्यक्ती चक्क BMW कारने येते!

नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. ११ जून २०२५

दिल्लीची चाट-पापडी खाण्याचे शौकीन कमी नाहीत. दिल्लीतील अनेक रस्ते असे आहेत जे स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहेत. येथील नेहरू प्लेसच्या गजबजलेल्या रस्त्यांवर एक चाटचं दुकान आहे जे इतरांपेक्षा वेगळे आहे. येथे चाटचा ठेला टाकणारे मुकेश शर्मा BMW कारमधून येतात, स्वतः दही फेटतात आणि ग्राहकांना प्रेमाने दहीवडे वाटप करतात. म्हणूनच लोक त्यांना ‘करोडापती चाटवाला’ म्हणतात.

दिल्लीतील मुकेश शर्मा नेहरू प्लेसमध्ये दुकान चालवतात. लोक त्यांना ‘करोडपती चाटवाला’ म्हणून ओळखतात. ‘शर्माजी चाट’ या नावाने स्टॉल चालवणारे मुकेश कुमार शर्मा 1989 पासून दही वड्याचं दुकान चालवत आहेत. लोक दूरवरून येथे स्वादिष्ट दहीवडे खाण्यासाठी येतात. मुकेश शर्मा BMW कारमधून दुकानासाठी सामान आणतात. मग, एका फोल्डिंग टेबलावर स्टॉल लावतात. दिल्लीच्या नेहरू प्लेसमध्ये अनेक आयटी कंपन्यांची कार्यालये असून या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. नेहरू मार्केट लॅपटॉप आणि संगणकांसाठी मोठी बाजारपेठ आहे.

मुकेश शर्मा आपला ठेला चालवण्यासाठी BMW गाडीतून सामना आणतात. गेल्या तीन पिढ्यांपासून शर्माजी हे काम करत असून त्यांचे पूर्वज कोलकात्यात दही-वड्याचं दुकान चालवायचे. मुकेश शर्मा यांच्या दही-वड्याच्या थाळीची किंमत 50 रुपये आहे आणि सर्व सामान ते स्वतः बनवतात. शर्माजी आपल्या दही-वड्यात एक प्रकारचा खास मसाला वापरतात, जो त्यांच्या दहीवड्याला विशेष बनवतो. मुकेश शर्मा रात्री 2.30 वाजता उठून दहीवडे बनवतात आणि सकाळी 9 वाजता दुकान उघडतात.

मुकेश शर्मा यांनी साल 1989 मध्ये त्यांच्या कुटुंबाच्या जुन्या दही-वड्याच्या रेसिपीपासून चाट विकायला सुरुवात केली. त्यावेळी एका प्लेटची किंमत फक्त 2 रुपये होती पण, हळूहळू चव आणि मेहनतीच्या जोरावर भरभराट होऊ लागली. आज त्यांच्या दही-वड्याच्या एका प्लेटची किंमत 50 रुपये आहे पण, लोक चव आणि दर्जा पाहून पैसे देण्यात संकोच करत नाहीत.

शर्माजींच्या चाटची खास गोष्ट म्हणजे त्याची चवच नाही तर तयारी देखील खास आहे. शर्माजी दररोज स्वतः दही फेटतात जेणेकरून मलाईदार आणि गुळगुळीत दही तयार होईल. तसेच स्वतः मसाल्यांचे मिश्रण देखील बनवतात, ज्यामुळे दही-वड्याला वेगळीच चव मिळते. ‘जर जेवणात खूप मेहनत घेतली तर ग्राहक स्वतःच त्याकडे आकर्षित होतात,’ असं त्यांना वाटतं.

फक्त सर्वसामान्यच नव्हे तर ऑफिसला जाणारे, कॉलेजचे विद्यार्थी आणि मोठे व्यापारी देखील शर्माजींच्या हातचे दहीवडे खायला आवर्जून येतात. इतकी मोठी रांग लागते की लोक वाट पाहातानाही आनंदी दिसतात.

मुकेश शर्मा यांचे यश केवळ पैसे कमविण्याची कहाणी नाही तर लोकांची मने जिंकण्याचीही आहे. शर्मा प्रत्येक ग्राहकाशी हसतमुखाने बोलतात आणि प्रत्येक प्लेट इतक्या काळजीपूर्वक बनवतात की जणू काही ते पहिल्यांदाच बनवत आहेत. त्यांच्या या वागण्यामुळे लोक पुन्हा पुन्हा त्यांच्या दुकानात येतात.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #CrorepatiChaatwala#MukeshSharma#NehruPlace#NewDelhi
Previous Post

जिंती ग्रामपंचायत सरपंच पदी सौ. मंगलताई जालिंदर माने यांची बिनविरोध निवड!

Next Post

उमरेड चांपा परिसरातील हळदगाव परसोडी खापरी रस्त्यांची दुरवस्था!

Next Post
उमरेड चांपा परिसरातील हळदगाव परसोडी खापरी रस्त्यांची दुरवस्था!

उमरेड चांपा परिसरातील हळदगाव परसोडी खापरी रस्त्यांची दुरवस्था!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

सगळेच निर्दोष, तर मग बॉम्बस्फोट घडवणारे कोण?

July 31, 2025
१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

१७ वर्षांची प्रतीक्षा संपली. मालेगाव स्फोटातील सातही आरोपींची निर्दोष सुटका!

July 31, 2025
कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.