DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

लंडनमध्ये राहात असलेल्या मल्ल्याला जोरदार फटका!

'ईडी'ने केली फ्रान्समधील फ्लॅटवर कारवाई. 

DD News Marathi by DD News Marathi
June 11, 2025
in ताज्या बातम्या, देश-विदेश, राजकीय
0
लंडनमध्ये राहात असलेल्या मल्ल्याला जोरदार फटका!

नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. ११ जून २०२५

कर्जबुडवा फरार उद्योजक विजय मल्ल्याची आर्थिक कोंडी सक्तवसुली संचनालयाकडून केली जात आहे. आज ईडीकडून फ्रान्समधील तपास यंत्रणांच्या माध्यमातून विजय मल्ल्याचा आलिशान फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. या अपार्टमेंटची किंमत १६ लाख युरो (भारतीय चलनात १४ कोटी रुपये) आहे. मल्ल्याने किंगफिशर एअरलाईन्सच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात प्रदेशात निधी वळवला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मनी लॉन्डरिंग संदर्भात मल्ल्याचा तपास केला जात आहे. मल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे.

आजच्या कारवाईबाबत ईडीकडून जरी करण्यात आलेल्या निवेदनात विजय मल्ल्या याची 32 Avenue FOCH ही फ्रान्समधील मालमत्ता जप्त करण्यात आली. या अपार्टमेंटची किंमत सुमारे १४ कोटी आहे. ईडीकडून २५ जानेवारी २०१६ रोजी किंगफिशर एअरलाईन्स, विजय मल्ल्या आणि इतर जणांविरोधात मनी लॉन्डरिंगचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. आतापर्यंत या प्रकरणी ईडीकडून ११२३१ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ५ जानेवारी २०१९ रोजी विशेष न्यायालयाने विजय मल्ल्या याला फरार घोषित केले होते.

सध्या ब्रिटनमध्ये विजय मल्ल्या याला भारताच्या स्वाधीन कारण्याबाबत खटला सुरु आहे. याआधी न्यायालयाने मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती, मात्र त्याला मल्ल्या याने आव्हान दिले. मल्ल्या याने ब्रिटन सरकारला शरणार्थी म्हणून आश्रय द्यावा, अशी विनंती केली आहे. भारत सरकारने या प्रकरणी विशेष बाब म्हणून मल्ल्या याचे प्रत्यार्पण मंजूर करावे, अशी विनंती केली आहे.

किंगफिशर एअरलाईन्सला बँकांच्या समूहाकडून जवळपास ७००० कोटींचे कर्ज देण्यात आले होते. त्यावर व्याज आणि दंडात्मक शुल्क मिळून हा कर्जाचा डोंगर १२ हजार कोटींपर्यंत वाढला आहे. मल्ल्या याने सर्व कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली होती. त्याने कर्ज बुडवल्याचा आरोप फेटाळून लावला होता. मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणाबाबत सध्या गोपनीय प्रक्रिया सुरू आहे, मात्र या कार्यवाहीची सद्यस्थिती आम्हाला ठाऊक नाही, अशी माहिती केंद्र सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयास गेल्या महिन्यात देण्यात आली होती.

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ED#France#MoneyLaundering#VijayMallya
Previous Post

उमरेड चांपा परिसरातील हळदगाव परसोडी खापरी रस्त्यांची दुरवस्था!

Next Post

चंद्रहार पाटील यांचे फायनल झाले!

Next Post
चंद्रहार पाटील यांचे फायनल झाले!

चंद्रहार पाटील यांचे फायनल झाले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.