पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. ०५ जुन २०२१
जागतिक पर्यावरण दिना निमित्त तळजाई टेकडीवर योग मित्र, तळजाई भ्रमण मंडळ व नगरसेवक सुभाष जगताप यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, यावेळी भरपुर प्रमाणात ऑक्सिजन देणा-या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
या वृक्ष लागवड कार्यक्रमाची सुरुवात नगरसेवक सुभाष जगताप यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी योग मित्रचे संस्थापक दिलीप दुर्वे, तळजाई भ्रमण मंडळाचे सदस्य अशोक पवार, आप्पा लांडे, तात्या पासलकर, श्रीकांत गोसावी, विलास खोपडे, सुभाष जाधव, कुडले, कालेकर व इतर नागरिक उपस्थित होते. या सर्व नागरिकांनी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या मार्गदर्शनाने या देशी वृक्षांची लागवड करुन पर्यावरण दिन साजरा केला.
या प्रसंगी बोलताना नगरसेवक सुभाष जगताप म्हणाले, “कोरोनाच्या संकटात आपल्या सर्वांना ऑक्सिजनचे महत्व समजले आहे. मी गेली २० वर्षापासून तळजाई टेकडी ही ऑक्सिजन टेकडी व्हावी म्हणून हजारो देशी वृक्षांची लागवड केली आहे. देशी वृक्षांच्या लागवडीकरीता सतत नवे उपक्रम राबवित असतो. यामध्ये मला अनेक अडथळे आणण्याचे प्रयत्न केले तरी ही मी जिद्दीने १०८ एकर जागेवर ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यासाठी मागे हटलो नाही. पर्यावरण आणि ऑक्सिजन पार्कसाठीचे माझे काम यापुढेही सदैव सुरुच राहिल. आजच्या काळातील पर्यावरणाचे महत्त्व, वृक्षांची लागवड, त्याची आत्ताची व भविष्यातील आपल्याला असलेली गरज सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. तसेच लागवड केलेल्या वृक्षांची प्रत्येकाने निगा राखा, आपली ऑक्सिजन टेकडी, आपले वृक्ष, आपले आरोग्य याबाबतची आपली जबाबदारी सर्वांनी चोखपणे पार पाडावी.”