DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

चंद्रहार पाटील यांचे फायनल झाले!

ठाकरे सेनेला बाय बाय करून सरकारसोबत जाणार.

DD News Marathi by DD News Marathi
June 11, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
चंद्रहार पाटील यांचे फायनल झाले!

सांगली प्रतिनिधी :
दि. ११ जून २०२५

डबल महाराष्ट्र केसरी आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांचे अखेर ठरले आहे, त्यांनी ठाकरे सेनेला रामराम ठोकला असून महायुती सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे ठाकरे सेनेला मोठा हादरा बसणार आहे.

चंद्रहार पाटील यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर पोस्ट केली. यामध्ये त्यांनी लिहिले की, राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना, बऱ्याच त्रुटी, अडचणी, गैरप्रकार मी अनुभवलेले आहेत. अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे. परंतु, प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे. म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं चंद्रहार पाटील म्हणाले.

चंद्रहार पाटील सोमवारी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाकरेंच्या मशालीची साथ सोडून धनुष्यबाण हातात घेणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय शिरसाट, मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री प्रताप सरनाईक हे ही उपस्थित राहाणार आहेत.

दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रहार पाटील उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीत उतरले होते. सांगली लोकसभेच्या जागेवरुन हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. मविआत असतानाही त्यांच्याविरोधात काँग्रेसचे विशाल पाटील निवडणुकीत उतरले. विशाल पाटलांनी निवडणुकीत बाजी मारली. त्यामुळे चंद्रहार पाटील नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. यातच काही दिवसांपासून चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने पाटलांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. तर श्रीकांत शिंदेंनीही डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत, असे कौतुकाचे बोल उद्गारले होते. ते जर आमच्या शिवसेनेत येणार असतील, तर त्यांचे स्वागत आहे, असे म्हटले होते.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ChandraharPatil#DoubleMaharashtraKesari#Mahayuti#UddhavThackeray
Previous Post

लंडनमध्ये राहात असलेल्या मल्ल्याला जोरदार फटका!

Next Post

यवतमाळ जिल्ह्यातील पारधी समाजाच्या विकासासाठी आदिवासी पारधी विकास परिषदेची जिल्हाधिकार्‍यांसोबत विशेष बैठक!

Next Post
यवतमाळ जिल्ह्यातील पारधी समाजाच्या विकासासाठी आदिवासी पारधी विकास परिषदेची जिल्हाधिकार्‍यांसोबत विशेष बैठक!

यवतमाळ जिल्ह्यातील पारधी समाजाच्या विकासासाठी आदिवासी पारधी विकास परिषदेची जिल्हाधिकार्‍यांसोबत विशेष बैठक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.