DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

यवतमाळ जिल्ह्यातील पारधी समाजाच्या विकासासाठी आदिवासी पारधी विकास परिषदेची जिल्हाधिकार्‍यांसोबत विशेष बैठक!

ही बैठक पारधी समाजाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल असा विश्वास.

DD News Marathi by DD News Marathi
June 12, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
यवतमाळ जिल्ह्यातील पारधी समाजाच्या विकासासाठी आदिवासी पारधी विकास परिषदेची जिल्हाधिकार्‍यांसोबत विशेष बैठक!

यवतमाळ प्रतिनिधी : अनिल पवार
दि. १० जून २०२५ :

यवतमाळ जिल्ह्यातील पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. आदिवासी पारधी विकास परिषदेचे विदर्भाध्यक्ष बबन गोरामन, प्रदेश युवा अध्यक्ष अतिश पवार, अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्हाध्यक्ष मनीष भोसले, बबन पवार, धर्मराज भोसले, मीतेश धुलिचंद भोसले, पूजा चव्हाण, नितेश भोसले, अनाडी भोसले, राजेश पवार आदींनी या बैठकीत सहभाग घेतला.

या बैठकीत आर्णी तालुक्यातील कारेगाव/कठोडा पारधी बेडा आणि नेर तालुक्यातील अजंती पारधी बेड्यावरील मूलभूत सुविधांवर चर्चा झाली. रस्ते, पिण्याचे पाणी, घरकुल, राहत्या घरांचे पट्टे, अंगणवाडी, शाळकरी विद्यार्थ्यांना विविध महसूल दाखले मिळावेत याकरिता पारधी बेडा तिथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करणे, यासह विविध समस्यांवर उपाययोजना सुचवण्यात आल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पारधी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी ठोस पावले उचलण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आदिवासी पारधी विकास परिषदेने समाजाच्या समस्यांना वाचा फोडत सरकारी योजनांचा लाभ मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांपासून परिषद, आर्णी आणि नेर तालुक्यातील पारधी बेड्यांच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. या सततच्या प्रयत्नांमुळे ही बैठक आयोजित झाल्याचे परिषदेच्या शिष्टमंडळाने सांगितले.

आदिवासी पारधी विकास परिषदेने पारधी समाजाच्या कल्याणासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. ही बैठक पारधी समाजाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आदिवासी पारधी विकास परिषदेने व्यक्त केला.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ParadhiBeda#ParadhiVikasParishad#Yavatmal
Previous Post

चंद्रहार पाटील यांचे फायनल झाले!

Next Post

राज्याच्या राजकारणासंदर्भात विशेष बातमी!

Next Post
राज्याच्या राजकारणासंदर्भात विशेष बातमी!

राज्याच्या राजकारणासंदर्भात विशेष बातमी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.