DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

राज्याच्या राजकारणासंदर्भात विशेष बातमी!

मनसे-ठाकरेसेना युतीच्या आधीच फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट.

DD News Marathi by DD News Marathi
June 12, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
राज्याच्या राजकारणासंदर्भात विशेष बातमी!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १२ जून २०२५

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे. वांद्र्यातील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही वेळापूर्वी राज ठाकरे पोहोचले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा या ठिकाणी दाखल झाला. या दोघांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. कारण आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र अचानक ठरलेल्या या भेटीमुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी युतीसाठी समोरून टाळी दिली होती. महाराष्ट्राच्या प्रश्नांसमोर आमची भांडणं काहीच नाहीत असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सकारात्मकपणे घेत युतीसाठा हिरवा कंदिल दिला होता. मात्र दोन्ही पक्षांमध्ये युतीला पूरक अशी चर्चा झाली नाही. मात्र आता देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट त्या दोघांच्याही नियोजनात नसताना झालेली आहे. बंद दाराआड झालेल्या चर्चेमध्ये आता ठाकरे बंधूंच्या युतीचा एंड होतो की येत्या निवडणुकांमध्ये आणखी वेगळी काही राजकीय समीकरणं जुळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DevendraFadanavis#Maharashtra#RajThackeray
Previous Post

यवतमाळ जिल्ह्यातील पारधी समाजाच्या विकासासाठी आदिवासी पारधी विकास परिषदेची जिल्हाधिकार्‍यांसोबत विशेष बैठक!

Next Post

राजा रघुवंशी हत्याकांडा! सोनमच खरी सूत्रधार?

Next Post
राजा रघुवंशी हत्याकांडा! सोनमच खरी सूत्रधार?

राजा रघुवंशी हत्याकांडा! सोनमच खरी सूत्रधार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.