DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अंबरनाथ स्थानकात धावत्या लोकलसमोर अंध व्यक्ती कोसळली थेट रुळांवर!

पुढे जे घडलं ते अतिशय थरारक.

DD News Marathi by DD News Marathi
June 12, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
अंबरनाथ स्थानकात धावत्या लोकलसमोर अंध व्यक्ती कोसळली थेट रुळांवर!

ठाणे प्रतिनिधी :
दि. १२ जून

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर एक मोठी दुर्घटना होता होता टळली. लोकल पकडण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्म आणि रुळांमधील अंतर लक्षात न आल्याने प्रवासी थेट रुळांवर कोसळला. परंतु, सुरक्षा जवान आणि इतर प्रवाशांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचे प्राण वाचले.

मुंबई महापालिकेचे कर्मचारी असलेले सिद्धनाथ माने अंध आहेत. ते संध्याकाळी ७ वाजता कर्जतला जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत होते. लोकल पकडण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने ते रेल्वे रुळावर पडले. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा जवान अमोल देवरे यांनी ते पाहिले. आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवले.

सिद्धनाथ माने हे अंबरनाथ रेल्वे स्थानकावर उभे होते. “लोकल आल्याची घोषणा झाली असता ते लोकल पकडण्यासाठी पुढे सरसावले,” असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्याचवेळी समोरून कर्जतकडे जाणारी लोकल येत होती. माने यांना प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्याने ते थेट रेल्वे रुळावर कोसळले. त्याचवेळी सुरक्षा जवान अमोल देवरे यांनी हे पाहिले. त्यांनी क्षणाचाही विचार न करता रुळावर उडी मारली. त्यांनी माने यांना उचलून प्लॅटफॉर्मवर आणले. यावेळी काही प्रवासी देखील त्यांच्या मदतीला धावले. ही संपूर्ण घटना स्टेशनवरील CCTV मध्ये कैद झाली आहे. अमोल देवरे यांच्या प्रसंगावधानामुळे एका दिव्यांगाचे प्राण वाचले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, दक्षिण मुंबईत कामावर येताना गर्दीच्या वेळी नोकरदारांना लोकलमधून अनेकदा लोंबकळत यावे लागते. अशाच काही नोकरदारांचा सोमवारी मुंब्य्राजवळ भीषण अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर नोकऱ्यांच्या विकेंद्रीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सर्व नोकऱ्या एकाच ठिकाणी असू नयेत, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नियोजन केले आहे. भिवंडी-निजामपूर महापालिकेजवळील खारबाव येथे विकास केंद्र विकसित होणार आहे. प्रस्तावित विरार-अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडॉर, मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे, दिल्ली फ्रेट कॉरिडॉर आदी प्रमुख पायाभूत सुविधांच्या निमित्ताने तेथे विविध गुंतवणूक आकर्षित करणारे केंद्र विकसित केले जाणार आहे. कल्याण येथेही व्यावसायिक आणि निवासी संकुल, शैक्षणिक संस्था आदींसाठी विकास केंद्र उभे केले जाणार आहे. तेथे राहणाऱ्यांना त्याच ठिकाणी नोकऱ्या व रोजगार उपलब्ध करण्याची योजना आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Ambernath#BlindMan#BlindManonRailwayTrack#SecurityGuard
Previous Post

राजा रघुवंशी हत्याकांडा! सोनमच खरी सूत्रधार?

Next Post

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर काम पूर्ण होण्या अगोदरच टोल वसुली!

Next Post
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर काम पूर्ण होण्या अगोदरच टोल वसुली!

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर काम पूर्ण होण्या अगोदरच टोल वसुली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

July 29, 2025
“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

July 29, 2025
गाडीने दोन पलट्या खाल्ल्या, पण वाहातूक पोलिस ठरला देवदूत!

गाडीने दोन पलट्या खाल्ल्या, पण वाहातूक पोलिस ठरला देवदूत!

July 29, 2025
उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर जाण्यास सज्ज?

उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर जाण्यास सज्ज?

July 29, 2025
श्रीनगरमधील चकमकीत पहलगाम हल्ल्यातील तीन संशयित दहशतवाद्यांना कंठस्नान!

श्रीनगरमधील चकमकीत पहलगाम हल्ल्यातील तीन संशयित दहशतवाद्यांना कंठस्नान!

July 28, 2025
ठाकरे बंधू एकत्र लढल्यास भाजपची स्थिती अवघड!

ठाकरे बंधू एकत्र लढल्यास भाजपची स्थिती अवघड!

July 28, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.