DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर काम पूर्ण होण्या अगोदरच टोल वसुली!

बावड्यातील टोल वसुलीला नागरिकांचा तीव्र विरोध. 

DD News Marathi by DD News Marathi
June 12, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर काम पूर्ण होण्या अगोदरच टोल वसुली!

इंदापूर प्रतिनिधी : राहूल चव्हाण
दि. १२ जून २०२५

इंदापूर ते अकलूज दरम्यान जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम पूर्ण होण्याअगोदरच सराटी या ठिकाणी टोल वसुली सुरू करण्यात आली आहे.या टोल वसुलीला बावडा ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलाय.रस्त्याचं काम अपूर्ण असताना ही केली जाणारी सक्तीची टोल वसुली तातडीने थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे केलीये.इंदापूर अकलूज रोडवर बावडा ग्रामपंचायत हद्दी मध्ये विना परवाना टोलनाका बांधकाम केले आहे. तरी सदर बांधकामा बाबत दोन दिवसात टोल व्यवस्थापनाकडून ग्रामपंचायतने खुलासा देखील मागवलेला आहे. अगोदर रस्ता पूर्ण करा, मग टोल वसुली करा अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.सदरचा टोलनाका दि.06 मे रोजी पासून चालू करण्यात आला आहे. परंतु या रस्त्यावरील अनेक ठिकाणचे रस्त्यावरील काम अपूर्ण आहे व इतर अनेक समस्या आहेत. या संदर्भातील लेखी निवेदन टोल प्रशासना सह भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास देण्यात आलं आहे. या निवेदनावर 250 हून अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.

काय आहेत मागण्या?

१) स्थानिक बावडा गावातील नागरिकांना पूर्ण टोल माफी करण्यात यावी.
२) बावडा गावापासून टोलनाका हा केवळ २ ते ३ किलोमीटर इतकाच आहे त्यामुळे बावडा ग्रामस्थांसोबत होणारी टोल सक्तीची मनमानी अन्यायकारक असून ती खपवून घेतली जाणार नाही.
३) बावडा गावातील व परिसरातील नागरिकांना टोल वरती नोकरीत प्राधान्य देण्यात यावे.
४) इंदापूर ते सराटी पालखी महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून २५ ते ३०% अपूर्ण असताना टोल वसुली कोणत्या आधारावर चालू केली?
५) इंदापूर ते सराटी पालखी महामार्ग रस्त्याची उच्चस्तरीय चौकशी करून कामाचा दर्जा तपासून सबंधित ठेकेदारावर कारवाई करावी.
६) टोल नाक्यावरती सर्व नियमावली टोल परिसरात मोठ्या अक्षरात प्रसिद्ध करण्यात यावी.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Indapur#TollNaka#UnauthorizedToll
Previous Post

अंबरनाथ स्थानकात धावत्या लोकलसमोर अंध व्यक्ती कोसळली थेट रुळांवर!

Next Post

अहमदाबादमध्ये टेकऑफनंतर काही मिनिटात विमान रहिवासी भागात कोसळले!

Next Post
अहमदाबादमध्ये टेकऑफनंतर काही मिनिटात विमान रहिवासी भागात कोसळले!

अहमदाबादमध्ये टेकऑफनंतर काही मिनिटात विमान रहिवासी भागात कोसळले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.