DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

उमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग 353D वरील टोल टाळण्यासाठी दररोज 700 ते 800 ओवरलोडेड ट्रकचा या रस्त्याचा वापर!

चांपा-परसोडी-डव्हा-खापरी रस्त्याची दुरवस्था; माजी सरपंच अतिश पवार यांची सिमेंटीकरणाची मागणी.

DD News Marathi by DD News Marathi
June 12, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
उमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग 353D वरील टोल टाळण्यासाठी दररोज 700 ते 800 ओवरलोडेड ट्रकचा या रस्त्याचा वापर!

नागपूर प्रतिनिधी :
दि. १२ जून २०२५ :

नागपूर जिल्ह्यातील चांपा, परसोडी, डव्हा, खापरी या गावांना जोडणाऱ्या 9 किमी रस्त्याची दुरवस्था स्थानिक नागरिकांसाठी गंभीर समस्या बनली आहे. उमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग 353D वरील टोल टाळण्यासाठी दररोज 700 ते 800 ओवरलोडेड ट्रक या रस्त्याचा वापर करत असल्याने रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून, स्थानिकांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या परिसरात कार्यरत असलेल्या डझनभर क्रशर खदानींमुळे खनिजकर्म विभागाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. मात्र, या रस्त्याच्या देखभाल आणि सुधारणेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. जड वाहतुकीमुळे उडणारी विषारी धूळ, पावसाळ्यात चिखलमय रस्ते आणि गड्ड्यांमध्ये साचणारे पाणी यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याचा सर्वाधिक त्रास शेतकरी, शाळकरी विद्यार्थी आणि आजारी व्यक्तींना सहन करावा लागत आहे.माजी सरपंच अतिश पवार यांनी या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधत रस्त्याचे सिमेंटीकरणाची आणि मजबुतीकरण करण्याची मागणी केली आहे.

“हा रस्ता आमच्या गावांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा आहे. शासनाला येथून कोट्यवधींचा महसूल मिळतो, पण आम्हाला मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिकांचे हाल होत आहेत,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच, ज्या ठिकाणी क्रशर प्लांटमुळे शासनाला उत्पन्न मिळते, तिथल्या सर्व रस्त्यांचे सिमेंटरीकरण करावे, अशी विनंती त्यांनी केली. स्थानिक शेतकरी सुनील पोहनकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गोविंदा ढगे, शेतकरी क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील ढगे, लक्ष्मीकांत धोपटे, रुपेश हजारे, संगीता नेवारे आदी स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

सिमेंटीकरणामुळे प्रवास सुलभ होईल आणि परिसरातील आर्थिक विकासाला चालना मिळेल. शासन आणि प्रशासन या मागणीवर कितपत त्वरित कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Champa#HeavyVehicles#TollNotPaid
Previous Post

माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत या चेहऱ्यांना संधी!

Next Post

पक्ष्याची धडक कारणीभूत की तांत्रिक बिघाड?

Next Post
पक्ष्याची धडक कारणीभूत की तांत्रिक बिघाड?

पक्ष्याची धडक कारणीभूत की तांत्रिक बिघाड?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.