DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

विमान अपघातानंतर विकृतीची पराकाष्ठा!

महिलेच्या रस्त्यावर पडलेल्या शीरासोबत लोकांनी घेतली सेल्फी!

DD News Marathi by DD News Marathi
June 13, 2025
in ताज्या बातम्या
0
विमान अपघातानंतर विकृतीची पराकाष्ठा!

अहमदाबाद प्रतिनिधी :
दि. १३ जून २०२५

अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडिया विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघाताने सगळ्या देशाला धक्का बसला. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतले आणि काही वेळातच नियंत्रण सुटून हे विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. विमानात 242 प्रवासी आणि कर्मचारी होते. या दुर्घटनेत एकूण 265 लोकांचा मृत्यू झाला आहे. विमान कोसळल्याने मोठी आग लागली. घटनास्थळी जळालेले अवशेष, धूर आणि लोकांचे मृतदेह विखुरलेले होते. ही दृश्य पाहून देशभरात हळहळ व्यक्त केली जात असताना एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.

विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाल्याने अपघाताची तीव्रता खूप जास्त होती. विमानाचे काही भाग इमारतींवर आदळले. त्यामुळे तिथेही नुकसान झाले. घटनास्थळावर आगीचे मोठे लोट दिसत होते. सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले होते. विमानाचे अवशेष जळालेल्या अवस्थेत होते. माणसांचे मृतदेह आणि त्यांचे अवयव विखुरलेले पडले होते. अनेक प्रवाशांचे मृतदेह ओळखणेही कठीण झाले होते. काही मृतदेह अर्धवट जळालेले होते, तर काही पूर्णपणे जळून खाक झाले होते. या हृदयद्रावक घटनेनंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

अपघातानंतर सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले. त्यातील एका व्हिडिओने सगळ्यांना लाज वाटेल असे कृत्य उघडकीस आणले. एका महिलेचे शीर धडावेगळे होऊन रस्त्यावर पडले होते. त्या ठिकाणी मदतीसाठी धावण्याऐवजी काही लोक त्या शीरासोबत सेल्फी काढत होते. त्याचे व्हिडिओ बनवत होते. हे पाहून “माणुसकी संपली आहे का?” असा प्रश्न निर्माण झाला. लोकांच्या या वागणुकीमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रिमलायनर विमान गुरुवारी दीड वाजता उड्डाण केल्यानंतर कोसळलं. विमानाशी संपर्क तुटला आणि ते 1 वाजून 40 मिनिटांनी कोसळल्याचं सॅटेलाईट इमेजवरून दिसतं. हे विमान 11 वर्षं जुनं होतं. विमानं उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते समुद्रासपाटीपासून 625 फूट उंचीवर होतं.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Ahemadabad#BoeingDreamliner787#PlaneCrash#VijayRupani
Previous Post

पक्ष्याची धडक कारणीभूत की तांत्रिक बिघाड?

Next Post

बाप्पा पावला आणि मी वाचले! देव तारी, त्याला कोण मारी?

Next Post
बाप्पा पावला आणि मी वाचले! देव तारी, त्याला कोण मारी?

बाप्पा पावला आणि मी वाचले! देव तारी, त्याला कोण मारी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
१०० स्पा सेंटरच्या नावाखाली पुण्यात सर्रास देहविक्री!

१०० स्पा सेंटरच्या नावाखाली पुण्यात सर्रास देहविक्री!

July 30, 2025
एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

July 29, 2025
सलमान खानसोबत शूटिंग अन् अशोक सराफांचा जीव धोक्यात!

सलमान खानसोबत शूटिंग अन् अशोक सराफांचा जीव धोक्यात!

July 29, 2025
“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

July 29, 2025
गाडीने दोन पलट्या खाल्ल्या, पण वाहातूक पोलिस ठरला देवदूत!

गाडीने दोन पलट्या खाल्ल्या, पण वाहातूक पोलिस ठरला देवदूत!

July 29, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.